टेस्टमध्ये ४०० विकेट्स घेणाऱ्या रिचर्ड हेडलीची पहिल्या सामन्यातील कामगिरी कशी होती? वाचून विश्वात बसणार नाही..
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूची मागणी सध्या वाढू लागली आहे. प्रत्येक संघ एक चांगल्या आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. याचं कारण असं की, अष्टपैलू खेळाडू आवश्यकतेनुसार फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संघाला मोलाचे योगदान देऊ शकतो. न्यूझीलंड संघाचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हेडली सर्व अष्टपैलू खेळाडूंसाठी आदर्श आहेत. कारण प्रत्येक अष्टपैलू खेळाडूला असे वाटत असेल की, त्याने रिचर्ड हेडली सारखी कामगिरी करावी. आज आम्ही रिचर्ड हेडली बद्दल का बोलतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर आजच्याच दिवशी रिचर्ड हेडलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते.
प्रत्येक खेळाडूला वाटतं की, त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात जोरदार कामगिरी करावी. मात्र रिचर्ड हेडली सोबत असे काहीच झाले नाही. ते आपल्या पहिल्याच सामन्यात हवी तशी कामगिरी करू शकले नव्हते. मात्र पुढे त्यांनी जे केलं ते संपूर्ण क्रिकेट विश्वाने पाहिले.
मिळाल्या होत्या केवळ २ विकेट्स..
हा सामना २ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान पार पडला होता. हा सामना ४ दिवसांचा होता. पाकिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडचा कर्णधार बेव्हन काँगडॉनने नवीन चेंडू हॅडलीकडे सोपवला. मात्र तो संघाला विकेट्स मिळवून देऊ शकला नाही. त्यानंतर रिचर्ड हेडली गोलंदाजीला आहे. रिचर्ड हेडली यांनी आसिफ इकबालला आपल्याच चेंडूवर झेल बाद करत माघारी धाडले होते. आसिफ जेव्हा बाद झाला त्यावेळी पाकिस्तान संघाची धावसंख्या २७१ होती. त्यानंतर ३०८ धावसंख्येवर रिचर्ड हेडलीने पाकिस्तान संघाचा पाचवा फलंदाज बाद केला.
इथून पाकिस्तान संघाचा डाव संपुष्टात यायला सुरुवात झाली. पाकिस्तान संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ३५७ धावांवर संपुष्टात आला. तर न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात ३२५ धावा करण्यात यश आले होते. या डावात हेडलीने फलंदाजीने मोलाचे योगदान देत ४६ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तान संघाने २९० धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे आव्हान मिळाले होते. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना, हेडलीला ७ षटक गोलंदाजी करून केवळ १ गडी बाद करण्यात यश आले होते. तर पहिल्या डावात त्यांना केवळ २ गडी बाद करता आले होते. पाकिस्तान संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघाला चौथ्या दिवशी ३ गडी बाद केवळ ७३ धावा करता आल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये केला होता सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम..
हेडली यांना हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. मात्र आजही त्यांचा उल्लेख सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून केला जातो. त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना १० जुलै १९९० मध्ये खेळला होता. ज्यावेळी त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज होते. त्यांनी ८६ कसोटी सामन्यांमध्ये ४३१ विकेट्स घेतल्या होत्या. हा विक्रम माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी मोडून काढला होता. तर फलंदाजी करताना त्यांनी २ शतके आणि १५ अर्धशतकांसह ३१२४ धावा केल्या होत्या.
काय वाटतं असा कुठला अष्टपैलू खेळाडू आहे, जो भविष्यात कसोटी क्रिकेटमध्ये रिचर्ड हेडली यांची जागा घेऊ शकतो? कमेंट करून नक्की कळवा.