या माणसाला फ़क्त त्याच्या नावामुळे ४० वेळा नोकरी नाकारण्यात आली !!!
"नाम में क्या रखा है ?"असं शेक्सपियर जरी म्हणाला असला तरी आज कल नाम में ही सबकुछ रखा है प्यारे!!! आता हेच बघा ना.. हा फोटोत दिसणारा इसम इंजिनियर आहे. तेही टॉप केलेला. पण फक्त नावामुळे याला २०१४ पोसून बेरोजगार राहावं लागत आहे. आता "याचं नाव काय आहे?"असं तुम्ही विचाराल, तर त्याच नाव आहे ‘सद्दाम हुसैन’. मरीन इंजिनियर असलेल्या सद्दामने ४० वेळा नोकरीसाठी मुलाखती दिल्या. पण त्याचे फक्त नाव बघूनच कंपन्यांनी नोकरी नाकारली.
इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसैन आणि या झारखंडच्या माणसाचं नाव सारखंच असल्याने मोठ्या मोठ्या कंपन्याही (निष्पाप) सद्दामला नोकरी देण्यापासून घाबरत आहेत. सुरुवातीला सद्दामला वाटलं कि आपल्यातील कमतरतेमुळे नोकरी मिळत नसावी. पण खरे कारण समजल्यावर त्याला धक्काच बसला.
सद्दाम हुसैनच्या आजोबांनी आपला नातू पुढे मोठं नाव करेल या आशेवर हे नाव ठेवलं होतं. आता नाव मोठं तर झालं पण भलत्याच कारणाने. सद्दामच्या बरोबर असणारे त्याचे मित्र नोकऱ्या मिळवून सेटल देखील झालेत. फक्त सद्दामलाच नोकरीसाठी अजूनही वणवण करावी लागतेय.
नावाच्या त्रासामुळे सद्दामने आपले नाव बदलून साजिद हुसैन ठेवले. पण त्रास कमी न होता उलट वाढतच गेला. त्याच्या दहावी आणि बारावीच्या सर्टिफिकेटवरील नाव बदलल्याशिवाय नाव पूर्णपणे बदलता येणार नाही असे सद्दामच्या युनिवर्सिटीने सांगितले आहे. शेवटी सद्दाम उर्फ साजिद याने झारखंड उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून ५ मे रोजी याबाबतीत सुनावणी होणार आहे.
शेवटी प्रश्न उरतोच की फक्त सद्दाम हुसैन या क्रूर माणसाच्या नावाशी साधर्म्य असल्याने कोणावर अशी वेळ आणणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? तुमचे मत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता...