भल्लालदेवला एका डोळ्याने दिसत नाही...वाचा काय म्हणाला राणा दग्गुबाती!!!
तुम्ही बाहुबली बघितला? आवडला?
यावर तुम्ही म्हणाल, ‘प्रश्नच नाही...आवडणारच ना येड्या!!!’
बाहुबली मधली भल्लादेवची भूमिका बघून आपल्या सर्वांनाच प्रचंड राग येईल. पण ते पात्र साकारणाऱ्या ‘राणा दग्गुबाती’ बद्दल एक बातमी वाचून तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. ही बातमी त्यानेच जाहीर केलीय मित्रांनो. बातमी अशी आहे की त्याला डाव्या डोळ्याने चक्क काहीच दिसत नाही.
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं ही गोष्ट अगदी तसूभरही जाणवू दिलेली नाही. तो म्हणाला कि ‘मी जर माझा उजवा डोळा बंद केला तर मला काहीच दिसणार नाही.’
मित्रांनो, लहानपणी राणाला कोणी तरी डावा डोळा दान केला. पण नवीन डोळ्यानेही त्याला दृष्टी येऊ शकली नाही. त्याच्यातल्या या कमतरतेमुळं मात्र त्यानं कधीच माघार घेतली नाही. कामाबद्दल असलेल्या निष्ठेनं त्यानं साकारलेली भूमिका त्याला अजरामर करून गेली.