आता लोकप्रिय होतीय 'बाहुबली साडी' : चित्रपटाची स्त्रियांवरही जादू..

मागच्या वर्षी रजनीकांतचा कबाली आला तेंव्हा साड्या आणि विमानांवरही रजनीकांतला छापलं गेलं होतं. एवढंच काय, दोन-चार सैराट साड्यापण दिसल्या होत्याच की. आता हाच प्रकार बाहुबली २ च्या बाबतीतही सुरू झालाय मंडळी. आंध्रात आता बाहुबली चित्रपटाचं यश असं देवसेना आणि बाहुबलीचा फोटो छापलेल्या साड्या खरेदी करून साजरं केलं जातंय. स्पष्ट सांगायचं झालं तर लोकांना बाहुबलीला मिळालेलं यश फॅशन म्हणुन मिरवायचं आहे.

स्त्रोत

या कल्पनेमागे सुपीक डोकं आहे ते सुप्रसिद्ध तेलगु लेखिका रजनी शकुंतला यांचं. आता या कोण आहेत हे आम्हाला माहीत नसलं तरी तिकडे त्या फेमस आहेत. तर यांच्याकडून आपल्या मैत्रीणींसाठी इलुरू प्रिंटींग मिलला ५० साड्यांची अॉर्डर देण्यात आली. ज्यावर बाहुबली (प्रभास) आणि देवसेना (अनुष्का शेट्टी) यांच्या फोटोचं डिझाईन छापलं आहे. या साड्या नेसूनच या बायका बाहुबलीचा फर्स्ट शो बघायला गेल्या. धन्य तो बाहुबली!!

आता हे सगळं सोशल मिडीयावर वायरल झाल्यामुळे इतर स्त्रियांना या साडीचा हेवा वाटणं साहजिकच होतं ना राव. म्हणून म्हणे अशा आणखी ५०० साड्यांची अॉर्डर दिली गेलीय. या साड्यांवर आता भल्लालदेव आणि राजमाताही असणार आहेत. बघा तुम्हालाही मिळते का अशी एखादी साडी... 

सबस्क्राईब करा

* indicates required