मुलींपेक्षा याच्याच डिमांड जास्त...वाचा जस्टिन बिबरच्या मागण्यांची लिस्ट!!!
राव जस्टिन बिबर भाऊ इंडियात येतोय. तर म्हटलं, आपल्या पुन्याची मिसल चारू. झणझणीत रस्सा, लिंबू मारके. मुंबईचा वडापाव पन चारू म्हटलं. पानी पुरी, टपरीचा चहा ते पन करू. ते फोरेनचं खाऊन कंटाळा आला असंल त्याला. पुनेरी पगडी पन खास मागवलेली आपन नानापेठेतून. मायला कित्ती कित्ती पिल्यान केलेले अपान त्याच्यासाठी. पन सगळ्यावर कोल्ड्रिंक सांडल यानं.
याचे कसले कसले ते डिमांड. आरा रा रा रा... लेडीज संगीताच्या कार्यक्रमाला पन बायका एवढा डिमांड नाय करत तेवढे या सिंगल पसलीनं केल्यात. असं कुठं असतंय का ?
आता अख्खी लिस्टच देतो ! आता तुमीच बघा याचे नखरे :
त्याच्या १० कंटेनर भरेल एवढ्या सामानात काय काय असतंय ते वाचा आधी :
सोफा
कपाट
प्ले- स्टेशन
वॉशिंग मशीन
पिंग-पँग टेबल
मसाज टेबल
फ्रीज
हे तर काहीच नाय राव ! लिस्ट अजून बाकी हाय !
- दोन दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग.
– हॉटेलमध्ये एकूण १३ रूम्सचं बुकिंग पायजे
– ड्रेसिंग रूमचे पडदे सफेदच पायजे.
– रूममधला फ्रीज काचेचा पायजे
– त्याच्या रूममध्ये २४ पाण्याच्या बाटल्या पाहिजेत.
- ४ एनर्जी ड्रिंकं
- ६ व्हिटॅमिन पाण्याच्या बाटल्या
- अर्धा गॅलन बदाम दूध
- ६ क्रीम सोडा
- वेगवेगळ्या फ्रुट ज्युसच्या बाटल्या मागेल तेव्हा हजर पायजे.
- १२ रुमाल
– जेवनामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही वरायटी पायजे.
– नारळ पानी, बदाम शेक, प्रोटिन पावडर, नैसर्गिक मध, हर्बल चहा आणि फळं असायला पायजे.
– तो राहील त्या एरियात कुठेही (अगदी प्लास्टिकचे सुद्धा) लिलीचे फुल नसावे.
– स्टेजच्या मागचं पोहायला जाकुझी पायजे याला.
– केरळ मधला मसाज करणारा एक्स्पर्ट गडी,
– बिबरच्या फॅमिलीसाठी वेगवेगळ्या मापाचे टी-शर्ट्स,
– संपूर्ण टीमसाठी १० लक्झरी गाड्या,
- २ वोल्वो बस,
– झेड प्लस सिक्युरिटी,
– बिबरचे स्वतःचे ८ बॉडी गार्डही त्याच्याबरोबर असतील.
वाचून दमला असाल मंडली तर शेवटचं सांगतो. डी.वाय. पाटील स्टेडिअमवर परफॉर्म करण्यासाठी तो गाडीनं नाय, तर उडत उडतचं (हेलिकॉप्टरने) येणार म्हणतोय. आता बोला.
किती हा खर्च त्यापेक्षा मी तर म्हनतो कव्वालीचा पिरोग्राम ठेवा. बजेट मधी पन बसंल अन आपलीच मानसं हायत म्हनून डिस्काउंट पन मिळंल.
काय बोलता, लावू का फोन कव्वालीवाल्यांना ?