या नवर्यानं जे केलं ते आपण करू शकतो का ?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/2-kermin_1494317370_0.jpg?itok=-PvdZmV3)
जगात जवळपास सगळीकडेच लागू असणारी एक परंपरा म्हणजे लग्नानंतर पत्नीनं आपल्या नावापुढं पतीचं नाव, आडनाव जोडायचं. इच्छा असो, नसो... हे होत आलंय, आजही सुरू आहे. आजकाल काही गुणी पती आपल्या पत्नीनं माहेरचंच आडनाव लावण्याला काही हरकत घेत नाहीयेत. पण या सगळ्या परंपरागत प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा एक नवरोबा भारतात सापडलाय.
अभिषेक मंडे भोट. नाव जरा वेगळं वाटतंय ? वाटणारच. कारण या भल्या माणसानं आपल्या नावापुढं आपल्या पत्नीचं आडनाव जोडलंय. पत्नीचं नाव आहे केर्मिन भोट. ४ वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं आणि लग्नानंतर लगेचच अभिषेकने परंपरेला फाटा देत हा विचित्र निर्णय घेतला. ज्यामुळं त्याला वडिल आणि कूटुंबीयांच्या नाराजीलाही सामोरं जावं लागलं.
अभिषेक आपल्या या कृतीतून स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार करतो. केर्मिन मुंबईतील एका पारशी कुटूंबात पाश्चात्य संस्कृतीच्या छायेखाली वाढलीय, तर अभिषेक एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटूंबात मोठा झालाय. केर्मिन वयाने अभिषेक पेक्षा मोठी आहे आणि तीची कमाईही अभिषेक पेक्षा जास्त आहे.
पत्नीवरचं प्रेम म्हणून म्हणा किंवा एक संवेदनशील माणूस म्हणून म्हणा, इतर पुरूषांमध्ये सर्रास आढळणारा पुरुषी दुराभिमान बाजुला ठेवून एक आदर्श पती कसा असावा याचं सोपं उदाहरण अभिषेकने आपल्याला दिलंय.