computer

आता पादा बिन्धास्त; वाचा पादण्याचे सात फायदे...

पादणं काही समाजात चांगलं समजलं जात नाही. पण त्याचं काय आहे, की पाद थांबवता येत नाही. कधीतरी चित्रविचित्र आवाज करत वायू त्याला जागा मिळेल तिथून बाहेर पडतोच. आजूबाजूचे नाकाला हात लावतात आणि पादणार्‍याचं हसं होतं. आपल्या घरात पादण्यात प्रसिद्ध असलेले किमान एखादा काका किंवा आजोबा असतातच आणि ते या हसणार्‍यांच्या पलिकडे गेलेले असतात. तुम्ही निंदा किंवा वंदा, त्यांचा असतो पादण्याचा धंदा...

 

पण पादणं हा शरीरधर्म आहे, अगदी तहान-भुकेसारखाच.. खरंतर पादणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे आणि त्यातून आपल्या शरीरात काय उलथापालथ होतेय, ती चांगली आहे की वाईट याबद्दल बरीच माहिती मिळते. आज पाहूयात पादण्याचे सात फायदे.. 

 

 

पादणं हा इशारा असतो

पाद हा आपल्या आरोग्याविषयी बरंच काही सांगू शकतो. तीव्र वास, सतत येणारा पाद, पादताना होणार्‍या वेदना ही सगळी तब्येत बरी नसल्याची लक्षणं आहेत. जर असा त्रास सतत होत असेल तर डॉक्टरला दाखवावं हे उत्तम.. 

 

 

 

पोटाचा घेर कमी होतो

मस्त भरपेट जेवण केल्यानंतर एकतर कमरेचा बेल्ट काढून बसावं लागतं किंवा पँट ढिली करून तरी बसावं लागतं. शरीर जड वाटून सुस्तावतं ते वेगळंच. आपण जसजसे जास्त खात जाऊ, तसतसं शरीर जास्त पाणी साठवून ठेवतं आणि आतड्यांत जास्त गॅस तयार होतो. या शरीरात अडकलेल्या गॅसला बाहेर जाऊ दिलं तर पोटाचा घेर केवढा कमी होतो माहित्येय ना? आणि म्हणे एका पादासोबत ६७ कॅलरीज खर्च होतात. 

 

पादण्याचा दर्प चांगला असतो..

शाळेत असताना हायड्रोजन सल्फाईड तयार करण्याचा प्रयोग केल्याचं आठवतंय? सगळेजण त्या वायूच्या वासाला फिदीफोदी हसत असतात. कारण  हायड्रोजन सल्फाईडला सडक्या अंड्यांसारखा किंवा पादल्यासारखा वास येतो. अर्थातच याचा वास जास्त घेतला तर हानीकरक होऊ शकतो, पण पादण्याच्या वासातून येणारा थोड्या प्रमाणातल्या वायूमुळे झटके, हार्ट ऍटॅक अशांसारख्या रोगांपासून आपलया शरीरातल्या पेशींचं रक्षण करतात असं शास्त्रज्ञांचं मत आहे.. 

 

पाद सांगतो काय खावं आणि काय कमी खावं..

चौरस आहार घेणं नेहमी चांगलंच. पण जर तसं होत नसेल, तर पोटातला गॅस बाहेर पडताना आपल्या आहारात काय कमी आहे हे सांगू शकतो. वेगवेगळं अन्न वेगवेगळे गॅसेस पोटात तयार करतं.  उदाहरणार्थ, जर तुम्ही पादत नसाल तर तुमच्या आहारात फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ कमी आहेत. म्हणजेच हिरव्या भाज्या आणि डाळींचा जेवणात स्थान द्यायला हवं. खूप जास्त मांसाहर केल्यास पादताना घाणेरडा दर्प येतो म्हणजेच मांस कमी करून इतर अन्न तितकंच घ्यायला हवं हेही वासावरूनच कळतं. 

 

पादणं हे निरोगी बॅक्टेरिया शरीरात असल्याचं लक्षण आहे..

तुम्हांला माहित आहे का बारीक शरीरयष्टीचे लोक खूपदा पादत असतात ते? आणि ते मस्त मजेतही असतात. कारण त्यांच्या अन्नात फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ, फळफळावळ आणि पाचक भाज्या जास्त असतात. या सर्वांमुळे आपल्या शरीरातील जीवाणूंना अन्न पचवण्याचं चांगलंच काम मिळतं, सारखं अन्न पचवण्याचा सराव होऊन ते पोटात खूपसा गॅस तयार करतात. म्हणजेच एकप्रकारे पादणं आपली पचनसंस्था चांगली असल्याचं लक्षण आहे.

 

पादणं आपल्या आतड्यांसाठी खूप चांगलं आहे..

आलेली शू-शी किंवा पाद यातलं काहीच रोखून धरणं हे आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस रोखून धरलं तर काही होणार नाही, पण सतत पाद धरून ठेवला तर त्याचा आपल्या पचनसंस्थेवर आणि पर्यायाने आतड्यांवर याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे बिन्धास्त पादणं हा त्यावर एकमेव उपाय आहे.. 

ते सगळं जाऊ द्या; पादण्यासारखं दुसरं सुख नाही म्हणूनतरी पादा..

जेव्हा पाद रोखून ठेवलेला असतो, तेव्हा पोटात मुरडा येतो, कससंच व्हायला होतं. थोडक्यात, जे जे काही शरीरात दुखतं आणि अस्वस्थ व्हायला होतं, ते शब्दांत न मांडण्यासारखं असतं. त्यामुळं मनाला आणि शरीराला बरं वाटण्यासाठी हळूच गॅस सोडणं यासारखा दुसरा पर्याय नाही.. 

 

पादाला सुगंधित करणारी अंतर्वस्त्रे

पादण्याचा इतकाच संकोच असेल तर त्यावरही उपाय आहे. म्हणजेच गॅसेस पास पण होतील आणि अजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रासही होणार नाही. 

पाहा बरं बुवा, आता पोद रोखून आजारांना निमंत्रण द्यायचं की बिन्धास्त पादायचं ते तुम्हीच ठरवा..

 

स्त्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required