भाषालिपीचा इतिहास - भाषा उजवीकडून डावीकडे का लिहिली जाते? काही भाषा उलट दिशेने का लिहितात?
भाषा हे एक माध्यम आहे. हे माध्यम माणूस एकमेकांना संपर्क करण्यासाठी, आपल्या भावना पोहोचवण्यासाठी वापरतो. अगदी बालवयातच आपण आपली मातृभाषा बोलू लागतो. जसे मोठे होतो, तसे लिहू लागतो. शाळा कॉलेजात आणखी भाषांची भर पडते. आपण काही परदेशी भाषाही शिकतो. मुख्यतः कुठलीही भाषा लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहितो. पण अनेक भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. याचे कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि या भाषा कोणत्या आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख जरुर वाचा.
आधी पाहूयात भाषालिपी लेखन पद्धतीचे विविध प्रकार कोणते आहेत ?
लेखन पद्धतीच्या दिशेला दिशात्मकता म्हणतात. डावीकडून उजवीकडे जाणार्या लेखन पद्धतींना काहीवेळा लॅटिन मुळांवर आधारित सिनिस्ट्रोडेक्स्ट्रल असे म्हणतात. उजवीकडून डावीकडे जाणार्या लेखन पद्धतीला Dextrosinistral असे म्हणले जाते. याशिवायही अनेक प्रकारच्या लेखन पद्धती किंवा स्क्रिप्ट अस्तित्वात आहेत. बरेच लोक वर्णमाला वापरतात आणि त्यात स्वर आणि व्यंजनं असतात.
आता आपण लिहिण्याचा इतिहास थोडक्यात पाहिला तर अनेक गोष्टी समजतील. प्राचीन काळी माणूस आपले विचार फक्त उभ्या-आडव्या रेघोट्या काढून व्यक्त करीत असे. नंतर हळूहळू चित्रलिपी तयार झाली म्हणजे सूर्य, वृक्ष,नदी,पक्षी अश्या चित्रांनी तो लिहू लागला. ही चित्रे आपल्याला प्राचीन गुहांमध्ये कोरलेली सापडली आहेत. या चित्रांतून त्या त्या वस्तूंचा बोध होऊ लागला.
फक्त भारतातच नाही, तर प्राचीन काळी इजिप्त व मेसोपोटेमिया या देशांतही चित्र काढूनच लिहिले जायचे. पण इजिप्तमध्ये ही चित्रे दगडांवर कोरली जायची. ती खोदून काढली जायची. मेसापोटेमियात चित्रे मातीच्या विटांवर खिळ्यांनी कोरली जात. विटांचा पृष्ठभाग मऊ असल्याने त्यांवर फक्त रेघाच ओढता येत. त्यामुळे ही चित्रे सांकेतिक झाली आणि ही चित्रे घेऊनच पुढे इराणी लोकांनी अक्षरे बनविली आणि लिपी तयार झाली. चित्रलिपी हा लिपीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा होता. भारतात त्या काळी ब्राह्मी लिपीचा उपयोग केला जात असे.
इतर भाषा 'सिलँबरी'चा वापर करतात. यामध्ये एखादे चिन्ह म्हणजेच अक्षर असते. जपानी भाषेत चीनी भाषेवर आधारित सिलँबिक लिपी आणि वर्णमालेचा वापर करण्यात येतो. चीनी भाषेत काहीअंशी चिन्हांचा वापर करणारी लेखन पद्धती वापरली जाते.
हिंदी आणि मराठी भाषा देवनागरी लिपीचा वापर करते. यात वर्णमाला असते. इंग्लिश भाषा प्राचीन रोमन लोकांनी वापरलेल्या लॅटिन वर्णमालेचा वापर करते. लॅटिन वर्णमाला मुख्यतः ग्रीक वर्णमालेतून, त्याआधी फोनिशियन वर्णमाला आणि इजिप्शियन हायरोग्लिफिक्स मधून आली आहे.
इंग्रजी भाषा डावीकडून उजवीकडे का लिहिली जाते?
मूळात जुने इंग्लिश रुनिक वर्णमालेत लिहिले गेले होते. ज्याला फुथर्क म्हणतात. रुन्स ही एक प्राचीन लिखाण पद्धती आहे. यात लेखन उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीचे आहे. पण त्यानंतर इंग्रजी डावीकडून उजवीकडे बदलले. याच कारण म्हणजे लॅटिन वर्णमाला जी डावीकडून उजवीकडे लिहितात ती इ.स. ११०० च्या अखेरीस, युरोपातील रोमन ख्रिश्चन धर्माच्या प्रसारामुळे रुन्समध्ये लिहिली जाऊ लागली. त्यामुळे इंग्रजी लिखाण आणि वाचन याचीही दिशा देखील बदलली.
उजवीकडून डावीकडे कोणत्या भाषा लिहिल्या जातात ?
अरेबिक, हिब्रू, पर्शियन, सिंधी व उर्दू या भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. यापैकी पर्शियन आणि उर्दू या भाषा अरबी वर्णमाला वापरतात.
संपूर्ण आशियामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लेखन पद्धती सापडतील. डावीकडून उजवीकडे, वरपासून खालपर्यंत अशी मंगोलियन भाषा असते. फिलिपाइन्समधील बातक आणि इंडोनेशियातीतील टँगबानवा. चीनी व जपानी दोन्ही भाषा उजवीकडून डावीकडे लिहितात. प्राचीन ग्रीक लेखन हे बुस्टोफेडाँन होते, ही लेखनाची एक प्राचीन पद्धत आहे. यात ओळी आलटून पालटून, उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात.
उजवीकडून डावीकडे लिहायचे मुख्य कारण काय आहे हे माहित नसले तरीही संशोधकानी अभ्यास करून अंदाज मांडले आहेत. एक मत असे आहे की, ईस्ट इंडियन भाषा बांबूच्या स्क्रोलवर जतन केली गेली होती. त्यामुळे ती भाषा उजव्या हाताला, वरुन खाली आणि उजवीकडून डावीकडे अशी वाचण्यास सोपी पडत असे.
मध्य पूर्व प्रदेशातील भाषा या दगडांवर लिहिल्या जात. त्यासाठी छिन्नीचा वापर करण्यात येत असे. त्यामुळे उजवीकडून डावीकडे लिखाणाची पद्धत सोयीची होती.
पूर्ण जगात अनेक भाषा लिहिल्या जातात. त्याची उत्पत्ती ही वेगवेगळ्या रूपात झाली आहे. इतिहासात याची उदाहरणे सापडतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कळवा.
शीतल दरंदळे