गुलजारांचा वाढदिवस : पाहा त्यांची मास्टरपीस गाणी !
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/gulzar%20%281%29.jpg?itok=NXM46Gv_)
गुलजार हे एक रसायन आहे. हे प्यावे तरी पंचाईत आणि नाही प्यायले तर 'हाय , कंबख्त तूने पी ही नही असा आरोप सिध्द करणारे '. आज १८ ऑगस्ट गुलजार यांचा वाढदिवस. या निमित्ताने घेऊ काही घोट या रसायनाचे !!!
मोरा गोरा अंग लईले..
बंदिनी चे "मोरा गोरा अंग लईले " हे गुलजारचे पहिले चित्रपट गीत. या गाण्यावर शैलेन्द्रच्या शैलीची छाप सहज दिसते, पण आशय मात्र शंभर टक्के गुलजार आहे. या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी बघा. अशा दोन चार ओळीतून संपूर्ण गाण्याचा भाव प्रकट करणे म्हणजे गुलजार!
कुछ खो दिया है पाइ के
कुछ पा लिया गंवाइ के
कहाँ ले चला है मनवा?
मोहे बाँवरी बनाइ के!!
वो शाम कुछ अजीब थी..
कवितेतल्या तरल आशयाला एका क्षणात गिरकी देऊन एक नव्या उंचीवर नेऊन ठेवणे हे खास गुलजार लक्षण आहे. खामोशी या चित्रपटातील वो शाम या गीतातील पहिल्या कडव्यात "मैं सोचता था, मेरा नाम गुनगुना रही है वो "..आणि दुसर्या कडव्यात एक सुखद गिरकी " मैं जानता हूं, मेरा नाम गुनगुना रही हैं वो ".
तुम आ गये हो..
दिवस संपत आला आहे . सांजलागण झाली आहे, आणि आता कोणत्याही क्षणी अंधार व्यापेल अशा क्षणी दुरावलेल्या प्रेम प्रकट व्हावे आणि लख्ख प्रकाश पडावा असे काही "आंधी" च्या "तुम आ गये हो नूर आ गया है " या गाण्यात आहे. पुन्हा एकदा दोन कडव्यांमधला गुलजार इफेक्ट बघा.. " हम तक तुम्हारी दुआ आ रही थी "आणि "जहाँ से तुम्हारी सदा आ रही थी "
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी हैरान हूँ मैं..
"मासूम" चे "तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी हैरान हूँ" हे गीत वरवर पाहता अगदी सोप्पं वाटतं. पण सोप्या वाक्यातून मनाला अचानक एका खोल डोहात नेऊन बुडवणं हे या गीताचं गुलजार लक्षण आहे.
मुस्कुराये तो मुस्कुराने के
क़र्ज़ उतारने होंगे...
मुस्कुराऊं कभी तो लगता है
जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है...
दिल ढूँढता है...
नॉस्टाल्जीया हा गुलजारचा हातखंडा प्रांत आहे. "मौसम" चे हे गाणे बघा. चित्रपटात हे गीत दोन वेगवेगळ्या मूड्स मध्ये आहे.
या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें..
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए..
दिल ढूँढता है...
आनेवाला पल...
घरोंदाचे "दो दिवाने शहरमें" किंवा "किनारा "चे नाम गुम जायेगा " या दोन्ही गाण्यांना फिल्मफेअर नॉमीनेशन मिळाले होते. पण १९८० आणि ८१ साली लागोपाठ फिल्म फेअर अवार्ड मिळालेली गाणी म्हणजे ’गोलमाल’ चे "आनेवाला पल" आणि थोडीसी बेवफाईचे "हजार राहें मुडके देखीं". गोलमालचे हे गीत ऐकावे शेवटच्या कडव्यासाठीच.
एक बार वक़्त से,
लमहा गिरा कहीं..
वहाँ दास्तां मिली,
लमहा कहीं नहीं..
थोड़ा सा हँसाके,
थोड़ा सा रुलाके,
पल ये भी जाने वाला हैं..
चड्डी पहनके फूल खिला है
फारसे वापरात नसलेले शब्द अचानक चलनात आणावे ही गुलजारची खासीयत आहे. "चल छैंय्या छैंया" या गीतात काय किंवा जंगलबुकच्या "जंगल जंगल बात चली है" मध्ये याचा प्रत्यय येतो. "चड्डी" हा शब्द एक आश्चर्याचा धक्का देतो, पण अधून मधून धक्के देणे हे गुलजारच्या कवितेत असतंच.
कजरा रे...
असाच एक धक्का गुलजारने दिला बंटी और बबलीच्या कजरा रे गाण्यातून! हलक्या फुलक्या गाण्यातल्या काही प्रतिमा चकित करणार्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ ..
सुरमेंसे लिखे तेरे वादे, आँखों की जबानी आते हैं ..
मेरे रूमालों पे लब तेरे बांध के निशानी जाते हैं ..
हो तेरी बातों में किमाम की खुशबू हैं ..
हो तेरा आना भी गर्मियों की लू हैं...
जागे है मन कहीं..
"गुरु" चे हे गाणे फारसे "लोकप्रिय" यादीतले नाही, पण हे गाणे बहुतेक गुलजारचे स्वतःचे स्वतःसाठी लिहीलेले असावे.
मेरा कुछ सामान..
काही रसायनांचे घोट घशाला एक शोष आठवणींसाठी सोडून जातात . गुलजारची कविता अशीच असते. देताना भरभरून देते असं वाटतं, पण मोबदलयात बरंच काही घेऊन जाते. या काही "मेरा कुछ सामान " मधल्या ओळी..
"एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे..
आधे सूखे, आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी..
गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो !
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो..