लाच घेणे म्हणजे नक्की काय ?

लाच घेणे म्हणजे नक्की काय ?
निजामाचा फिरबीखान नावाचा दिवाण होता.
तो इनाम,जहागिरी,वतने, सरंजाम इत्यादी प्रकरणात सारख्या शिफारसी करत असे.
एकदा निजामाला शंका आली की हा पैसे खात असावा. त्याने फिरबीखानाला बोलावून म्हटले की
'अशा अतिशयोक्तीने भरलेल्या शिफारसी करणे योग्य नाही'
यावर फिदबीखान म्हणाला 'आपली कामे काढून घेण्याचे अनेक मार्ग लोक अवलंबितात'.
बादशहाने पैसे घेतले तर लोक त्याला 'पेशकश' (खंडणी) म्हणतात.
वजिराने पैसे घेतले तर त्याला 'नजर'(देणगी) म्हणतात.
खानसामाने पैसे घेतले तर त्याला 'दस्तुर'(वहिवाट)म्हणतात.
खात्याच्या प्रमुखांनी पैसे घेतले तर त्याला 'शुकराना'(आभार प्रदर्शन) म्हणतात.
कारकूनांनी पैसे घेतले तर त्याला 'तहरिर'(मजकूर) म्हणतात.
धर्मखात्याच्या मुख्याने घेतले तर त्याला 'मेहेराना'(कृपा) म्हणतात.
सरकारी अधिकार्यानी काही घेतले तर त्याला जरीन (कांचन) म्हणतात.
स्वारशिपायांनी घेतले तर ते सजालवाना (दंडेली) होय.
आणी फिदबी खानाने काही घेतले ती रिश्वत (लाच) काय ?
असे सणसणीत उत्तर देऊन फिदबीखान निघून गेला.