भारतीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ११ बातम्या !!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87_0.jpg?itok=nyyg-YpO)
भारतीय इतिहासात अश्या काही घटना घडल्या ज्यांनी पुढील भविष्याला वेगळीच कलाटणी दिली. अश्या घटनांची संपूर्ण विस्तारित माहिती कुठे येत असेल तर ती म्हणजे वर्तमानपत्र. टीव्ही सारखं तंत्रज्ञान नसलेल्या त्याकाळात वर्तमानपत्र हे लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचं एक प्रभावी मध्यम होतं. या वर्तमानपत्रांनी अश्या अनेक बातम्या दिल्या.
इतिहास बदलणाऱ्या आशयाच काही घटना घडल्यानंतर वर्तमानपत्रात आलेली पहिली बातमी आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी पेश करत होतो.
चला तर मग इतिहासात थोडं मागे जाऊ.
११. १५ ऑगस्ट १९४७. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टाईम्स ऑफ इंडिया मध्ये झळकलेली बातमी.
१०. ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधींच्या हत्येनंतर हिंदुस्तान टाईम्स मध्ये आलेली बातमी.
९. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक बनले त्यावेळी आलेली इंडिअन एक्स्प्रेस मधली बातमी.
८. दोन्ही आघाड्यांवर चीन ने हल्ला केल्याची बातमी १९६२ मध्ये आलेली. इथूनच ‘इंडो-चायना’ युद्धाला सुरुवात झाली.
७. भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानचा पराभव झाला आणि बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी पहिल्या पानावर झळकलेली बातमी.
६. १९७५ साली घोषित झालेल्या आणीबाणीच्या वेळी झळकलेल टाईम्स ऑफ इंडिया मधील बातमी. या घटनेने भविष्यात अनेक घटनांना जन्म दिला.
५. १९८४ साली झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर इंडियन एक्स्प्रेस मध्ये आलेली बातमी.
४. ‘ब्लॅक फ्रायडे’ नावाने प्रसिद्ध या दिवसाला खरच काळा दिवस म्हणावं लागेल. १९९३ साली मुंबई मध्ये १२ ठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आले. याचवर्षी ७ सप्टेंबर २०१७ रोजी या संदर्भात न्यायालयाने निकाल दिला आहे.
३. एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे कारगिल विजय. यावेळी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये आलेली बातमी.
२. २६/११ रोजी मुंबई वर झालेल्या हल्ल्यानंतर आलेली बातमी. यात आपण सीसीटीव्ही मध्ये टिपलेलाकसाबचा फोटो पाहू शकतो.
१. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अनपेक्षितपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची बातमी आली. मुंबईच्या इतिहासातील ही आणखी एक धक्कादायक बातमी होती. यावेळी लोकसत्ता मध्ये आलेली बातमी !!
यातील प्रत्येक घटनेमुळे झालेला परिणाम आजही कायम आहे !!
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा