पृथ्वीबद्दल या १० रंजक गोष्टी माहित आहेत का ?
ज्या ग्रहावर आपण राहत आहोत त्या पृथ्वीबद्दल आपल्याला आजही अनेक गोष्टी माहित नाहीत. तंत्रज्ञान बदललं, संशोधन प्रगत झालं, नवीन गोष्टींचा उलगडा होत गेला, पण.. तरीही पृथ्वी अजूनही माणसाला तिच्या रहस्यांमुळे अचंबित करत आहे. दिवसेंदिवस तिच्याबद्दल नवनवी माहिती समोर येत आहे. अशीच काही रंजक माहिती आम्ही आज घेऊन आलो आहोत.
चला तर आज पृथ्वीबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी जाणून घेऊया...
१. पृथ्वीवर जीवन असण्याचं कारण?
सूर्यमंडळात इतर ग्रहांवर जीवसृष्टी नाही (?) पण पृथ्वीवर आहे असं का? याचं उत्तर पृथ्वीतच आहे. २१% ऑक्सिजन, ७८% नायट्रोजन आणि ०.०४% कार्बनडायऑक्साईड या संतुलित घटकांमुळे पृथ्वीवर जीव सृष्टी तयार होण्यास आणि टिकून राहण्यास मदत झाली. म्हणजे जीवसृष्टी तयार होण्यासाठी पृथ्वीवर एकदम योग्य वातावरण आहे.
२. पृथ्वीचं फिरणं कमी होत आहे का ?
हो, संशोधन असं सांगतं की पृथ्वीची गती शतकागणिक कमी होत चालली आहे. पण गती कमी होण्याची प्रक्रिया एवढी हळुवार आहे की पृथ्वी जाणवण्याइतकी संथ होण्यासाठी अजून लाखो वर्ष लागतील. त्या लाखो वर्षांनी आपला दिवस २४ तासांचा न राहता २५ तासांचा झालेला असेल.
३. पृथ्वी पूर्णपणे गोल नाही.
पृथ्वीची असंख्य चित्रे पृथ्वी गोल असल्याची ग्वाही देतात, पण तथ्य हे आहे की पृथ्वी पूर्णपणे गोल नाही. पृथ्वीचा उत्तर दक्षिण भाग हा चपटा असून पूर्व-पश्चिम भागात ती पसरट आहे. या फरकामुळे पृथ्वीच्या मध्यापासून उत्तरेच्या भागापर्यंतच्या अंतरात आणि पश्चिम किंवा पूर्वेपासून पृथ्वीच्या मध्यापर्यंतच्या अंतरात २१ किलोमीटरचा फरक आहे. याचा अर्थ पृथ्वी गोलही नाही आणि सपाटही नाही.
४. पृथ्वी म्हणजे घट्ट मातीचा गोळा !!
पृथ्वी सूर्यमंडळात सर्वात घट्ट आणि जड ग्रह आहे. याचं कारण म्हणजे पृथ्वी वेगवेगळ्या थरांनी बनलेली आहे.
पृथ्वीच्या विरुद्ध सर्वात कमी जड ग्रह हा शनी आहे.
५. लीप वर्ष का असतं?
आपण दिवसाचे तास २४ असतात असं मानतो. पण खऱ्या अर्थाने एका दिवसात २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९१६ सेकंद असतात. याच उरलेल्या ४ मिनिट ४.०९१६ सेकंदामुळे दर ४ वर्षांनी लीप वर्ष येतं. या लीप वर्षात २९ फेब्रुवारी हा वाढीव दिवस सामील असतो. २९ फेब्रुवारीच्या मागचं कारण हे दर दिवसाच्या त्या उरलेल्या ४ मिनिटांमध्ये आहे.
६. सूर्याभोवती गोल गोल फिरणे
वैज्ञानिकांच्या संशोधनातून हे सिद्ध झालंय की पृथ्वी सूर्याभोवती पूर्णपणे गोल फिरत नाही. खरं तर सूर्यसुद्धा पूर्णपणे मधोमध नसतो. त्यामुळे जानेवारी आणि जुलै दरम्यान पृथ्वी सूर्याच्या जास्त जवळ असते.
७. अंतराळातील धूळ
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पृथ्वीवर चक्क दर दिवशी अंतराळातून उल्का कोसळत असतात आणि त्यांची धूळ पसरत असते. या धुळीपासून आपला बचाव आपलं वातावरण करतं. अधिकतम धूळ पृथ्वीच्या वातावरणातच घर्षणामुळे जाळून नष्ट होतात, त्यामुळे पृथ्वी सुरक्षित राहते.
८. सूर्याच्या किरणांची गती किती असते ?
सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर तब्बल १५ कोटी किलोमीटर आहे. त्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ८ मिनिटे २० सेकंदाचा वेळ लागतो.
आणखी वाचा :
९. सर्वात लांब पर्वतरांग कुठे आहे ?
दक्षिण अमेरिकेतल्या पश्चिम किनाऱ्यावरची ‘आन्देस’ ही पर्वतरांग जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे असं मानलं जातं, पण पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग ही खऱ्या अर्थाने समुद्राच्या खाली आढळते. या पर्वतरांगा ९०% पाण्याच्या खाली आहेत आणि सक्रीय ज्वालामुखींनी भरलेल्या आहेत.
१०. पृथ्वीवरील पाणी
पृथ्वीचा ७०% पृष्ठभाग पाण्याने आच्छादलेला आहे. त्यातलं ३% पाणी पिण्यालायक असून उरलेलं ९७% पाणी हे खारं असल्याने माणसाच्या उपयोगाचं नाही.
आहे की नाही अजब गजब ?
आणखी वाचा :
जगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल ? पहा हा व्हिडीओ !!