computer

पेप्सीची स्कीम त्यांच्याच अंगलट कशी आली? फिलिपाईन्समध्ये युद्ध सुरु करणारी घटना जाणून घ्या!!

अनेक मोठ्या कंपन्या आपल्या वस्तू जास्तीतजास्त प्रमाणात विकल्या जाव्यात यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करत असतात. त्यासाठी त्यांचा मार्केटिंग विभाग विविध डोक्यालिटी लढवत असतो. पण जर का यात काही चूक झाली तर कंपनीला त्यांचीच कल्पना अंगाशी येऊ शकते. 

काही वर्षांपूर्वी पेप्सी कंपनीने फिलीपाईन्स देशात एक स्कीम काढली होती. त्यांनी पेप्सीच्या बाटलीच्या झाकणावर तीन अंकी क्रमांक लिहिला. हा क्रमांक जर जिंकणाऱ्या क्रमांकाशी जुळला तर त्या व्यक्तीला १५ लाख रुपये मिळतील. एकार्थी हे लकी ड्रॉ सारखेच होते.

१५ लाख म्हणजे त्याकाळी फिलिपाईन्समध्ये मोठी किंमत होती. लोकांनी पैशांच्या मोहापायी मोठ्याप्रमाणात पेप्सी विकत घ्यायला सुरुवात केली. पेप्सीच्या विक्रीत ४० टक्क्याने वाढ झाली. या मोहिमेत तब्बल ३ कोटींपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला. विशेष म्हणजे ही संख्या म्हणजे फिलिपाईन्सच्या त्यावेळच्या लोकसंख्येच्या निम्मी होती. पण २५ मे १९९२ साली एक मोठी चूक झाली. जिंकणारा क्रमांक होता ३४९. पण जिंकणारी व्यक्ती एक किंवा दोन नसून ६ लाख माणसं निघाली. हे कसं घडलं? 

तर, ज्या अल्गोरिदमने बाटल्यांवर क्रमांक छापण्यात आले होते त्यात गोंधळ झाला आणि चक्क जिंकणारा क्रमांकच ६ लाख बाटल्यांवर छापला गेला. त्या सर्व बाटल्या लोकांपर्यंत पोचल्यावर सगळ्यांनाच वाटलं की आपणच जिंकलो. आता पेप्सी जर ६ लाख लोकांना १५ लाख देईल तर त्यांचे दिवाळे निघेल. पेप्सीने चूक झाली म्हणत हात वर केले, आणि एक भरपाई म्हणून प्रत्येकाला १८ डॉलर्स देण्याचे कबूल केले. 

पण, १५ लाखांकडे डोळे लावून बसलेल्या लोकांचे १८ डॉलरवर समाधान कसे होईल? लोकांमध्ये संताप पसरला. तब्बल १० हजार लोकांनी पेप्सीवर केस ठोकली. लोकांचा संताप असा तसा नव्हता. काहींनी ग्रेनेड आणि इतर शस्त्रांच्या साहाय्याने हल्ले सुरू केले. पेप्सीच्या अधिकाऱ्यांना देश सोडून पळावे लागले. कंपनीचे ४० ट्रक जाळण्यात आले. ५ लोक यात ठार झाले तर कित्येक जखमी झाले.

पेप्सीची आयडिया तर चांगली होती पण एका चुकीने त्यांचे एवढे मोठे नुकसान केले. 'आयडिया केली आणि खड्ड्यात गेली' अशी पेप्सीची या प्रकरणात गत झाली.

सबस्क्राईब करा

* indicates required