उत्तर कोरिया बद्दल या १५ गोष्टी माहित आहेत का? भारत यापुढे स्वर्ग वाटेल...!
उत्तर कोरिया बद्दल एव्हाना तुमच्या कानावर उडती उडती खबर आलीच असणार. एवढा क्रूर देश आज जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही राव . उत्तर कोरियाची शासन पद्धती आणि त्याचा हुकूमशहा हे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरलेत. नागरिकांवर लादलेले कायदे, न्याय व्यवस्था, शिक्षण..पद्धती सगळंच एखाद्या 'फिक्शन मूव्ही' सारखं. हिटलरच्या नाझी जर्मनीची आठवण करून देणारा, पण त्याही पेक्षा अनेक पावलं पुढे असलेली शासन यंत्रणा उत्तर कोरियात आहे.
आता तुम्हाला वाटेल उ. कोरियात नेमकं आहे तरी काय? त्या देशात असं काय आहे की त्याला जगातला नरक म्हटलं जातं? आज याच सर्व प्रश्नांचा आढावा घेत जाणून घेऊया, उत्तर कोरिया बद्दलच्या काही धक्कादायक गोष्टी...
१. उ. कोरियात २०१७ ऐवजी १०४ वं वर्ष चालू आहे.
हा खूपच विचित्र प्रकार आहे मंडळी. आपल्या इकडे २०१७ चालू असताना उ. कोरियात मात्र अजून १०४ वं वर्ष चालू आहे. याचं कारण म्हणजे तिथे कालगणना Kim II – Sung यांच्या जन्मानंतर सुरु होते.
२. उ. कोरियामध्ये आठवड्याचे सातही दिवस काम करावं लागतं.
याचा अर्थ नो छुट्टी!! हे ऐकूनच आपले डोळे पाणावतील राव. सहसा आपण ६ दिवस काम करतो. पण उत्तर कोरियात ६ दिवस काम करून तुम्हाला रविवारच्या दिवशी देशाच्या प्रगतीसाठी योगदान म्हणून काम करावं लागतं, तेही बिन पगारी बरं का !!
३. सामान्य माणसासाठी इथे इंटरनेटवर बंदी आहे
मंडळी उ. कोरियाचं स्वतःचं ‘रेड स्टार’ नावाची ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि इंटरनेट काही ठराविक माणसांसाठीच उपलब्ध आहे. इंटरनेटसुद्धा सरकारच्या ताब्यात असल्याने तुम्ही कोणत्याही इतर देशातील घडामोडी पाहू शकत नाही. (भौ आंबट शौकिनांसाठी अगदी नरक आहे हा तर..)
४. पूर्ण देशात फक्त ४ टीव्ही चॅनेल्स
हे सर्व चॅनेल्स सरकार नियंत्रित आहेत. अर्थातच, त्यावर सरकार तेच दाखवते जे त्यांना योग्य वाटतं. North Korea, namely Korean Central Television, Mansudae Television, Ryongnamsan Television, आणि Sports Television हे ते चार चॅनेल्स.
आपल्या इकडच्या बायका रात्री सिरीयल बघितली तरी तिचा रिपीट टेलिकास्ट सोडत नाहीत आणि या नॉर्थ कोरिया मध्ये तर फक्त चारच टीव्ही चॅनेल्स आहेत. तिकडच्या आया माया काय करत असतील ब्वा ?
५. थ्री जनरेशन पनीशमेंट (Three Generation Punishment)
याचा अर्थ जर कोणी एखादा गुन्हा केला, तर त्याच्या ३ पिढ्यांना त्याची शिक्षा मिळते. म्हणजेच त्याच्या पालकांना, पती किंवा पत्नीला आणि त्याच्या मुलांना सुद्धा. उ. कोरियात अश्या गुन्हेगारांना वर्ककॅम्पमध्ये पाठवले जाते. वर्क कॅम्प मधून सुटका 'मुश्कील ही नही, नामुमकीन है !!'
६. या देशातसुद्धा निवडणुका होतात पण उमेदवार मात्र एकच असतो.
हास्यास्पद म्हणजे उ. कोरिया स्वतःला लोकशाही देश म्हणवतो. त्यामुळे निवडणुका तर होणारच. इथे सुद्धा दर ५ वर्षांनी निवडणुका होतात. पण मत फक्त एकाच पक्षाला द्यावं लागतं. त्यामुळे जिंकणार कोण हे सर्वांनाच माहित असतं. जरी कोणत्याही नागरिकाला विरोधात मत द्यावसं वाटलं, तर देऊ शकतो मात्र ते अत्यंत धोकादायक आहे.
७. नागरिकांची हेअर स्टाईल सुद्धा सरकार निश्चित करते.
पूर्ण देशाच्या नागरिकांना फक्त सरकार मान्य हेअरस्टाईलच ठेवण्याची परवानगी दिली आहे. ठराविक हेअर स्टाईल ठेवण्याची परवानगी, शिवाय 'किम जाँग उन'ची हेअरस्टाईल कॉपी करायची नाही असाही नियम आहे. या नियम किम जाँग उनला मात्र लागू पडत नाहीत. लिस्ट मध्ये दिलेल्या हेअरस्टाईल सोडून दुसरं ट्राय करायचयं असेल तर जीवावर बेतू शकतं.
८. सुंदर मुलींची भरती असलेलं उ. कोरियातीली प्लेजर स्क्वाड.
बरोब्बर.... अगदी बरोब्बर... तुम्ही जो विचार करताय ना तेच या मुली करतात....काही वेगळं सांगायला नको.
९. इतिहासाचे जगावेगळे पुस्तक.
उ. कोरियात इतिहासाच्या पुस्तकात फक्त किम जोंग I आणि किम जोंग II यांच्याच वीर गाथा ऐकवल्या जातात. हे म्हणजे स्वतःची ला** करून घेण्यासारखं झालं.
१० घराला फक्त राखाडी कलर देऊ शकतो.
घराला रंग देताना फक्त राखाडा कलरच द्यायचा असा इथला नियम आहे. तुम्ही जर नियम तोडलात तर मग तुमची खैर नाही. रंग दिल्यानंतर भिंतींवर नेत्यांचे फोटो लावण्याचाही नियम आहे.
११. देशात गांजा सरकार मान्य आहे.
१२. हा देश इतर जगापासून पूर्णपणे तुटलेला आहे
स्रोत
उ. कोरियात राहणाऱ्या माणसांना देशाबाहेर काय चालू आहे हे जवळ जवळ माहितीच नसतं. कारण तिकडच्या बातम्या, वर्तमानपत्र, मासिक हे सर्व सरकारला हवं तेच फक्त प्रसारित करतात.
१३. सनकी हुकुमशहा !!
आता एवढे सगळे भयानक नियम बनवणारा नॉर्मल कसा असल ब्वा? एखाद्या पौराणिक काळातील राक्षस शोभावा असाच आहे किम जाँग उन. त्याने आपल्या स्वतःच्या काकाला १२० भुकेल्या कुत्र्यांच्या पुढे नग्न अवस्थेत टाकलं होतं.
कॉम जाँगला स्वतःविषयी काही बोललेलं चालत नाही. सरकारी धोरण, देशातील परिस्थिती यावर काहीही बोलायचं नाही असा नियमच आहे इथं.
१४. मागील ६० वर्षात २३००० माणसं दक्षिण कोरियात पळाली आहेत.
खरं तर २३००० हजार पेक्षा कितीतरी जास्त माणसं पळाली असती. पण सीमेवर जवान इतके काटेकोरपणे पहारा देत असतात, की तुम्ही प्रयत्न जरी केलात तरी तुमचं मरण निश्चित. यातही असं म्हणतात की २ माणसे दक्षिण कोरियातून उत्तर कोरियात दाखल झालीत. या दोघांना कदाचित आत्महत्या करायची असावी.
१५. नॉर्थ कोरिया फिरायचं आहे ? मग नियम कडक आहेत भौ !
काही वर्षांपर्यंत उ. कोरियात गेलेल्या पर्यटकांना फोटो काढण्याची परवानगी नव्हती. परंतु आता ती परवानगी मिळाली आहे. पण तुमच्यावर पळत ठेवली जाणार हे नक्की. तुम्हाला तेच पाहावं लागेल जे गाईड दाखवेल, स्थानिक माणसांशी बोलायचं नाही, आणि इथल्या गरीबीचे फोटो काढणं बॅन आहे. म्हणजे काय तर सेल्फीला खुट्टा !
शेवटी काय तर उ. कोरिया म्हणजे जवळजवळ वेगळं जगच आहे.
जे भारतासारख्या लोकशाही देशाला नावं ठेवतात आणि असहिष्णुताच्या नावाने बोंब मारतात त्यांच्यासाठी एकच वाक्य म्हणावसं वाटतं : 'कुछ दिन तो गुजारिए उत्तर कोरिया में !!!'