खवय्यांनो लवकर निघा : मुंबईत भरतोय 'भजी महोत्सव !!'
धोधो कोसळणारा पाऊस, गरमागरम भजी आणि वाफाळणारा चहा, हे कॉम्बिनेशन तसं सगळ्यांच्याच ह्रदयावर राज्य करत असतं. आता मुंबईकरांना जर या पावसात हा भारी अनुभव घ्यायची इच्छा असेल तर ही पर्वणी तुम्ही दवडू नका. दादर सांस्कृतिक मंचातर्फे पहिल्यांदाच 'भजी महोत्सव' आयोजित करण्यात आलाय.
या महोत्सवात भजी प्रेमींना वेगवेगळ्या २५ प्रकारच्या भज्यांचा आस्वाद घेता येईल. चिज भजी, पालक भजी, मिर्ची भजी, कांदा भजी, बटाटा भजी, पनीर भजी इथंपासून अनेक नॉनव्हेज भज्यांची मेजवानीही या महोत्सवात तुम्हाला मिळेल. यासाठी मुंबईकरांना जास्त वाट बघण्याचीही गरज नाहीये. उद्याच, म्हणजे २४ तारखेला दादर पश्चिम मधल्या अन्टोनिया डिसिल्व्हा हायस्कूलच्या प्रांगणात संध्याकाळी ५ ते ९ या वेळात हा महोत्सव भरणार आहे.
विशेष म्हणजे इथे भज्यांसोबत गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित केला गेलाय. नवोदित गायकांना आपली कला सादर करण्याचा चान्सही आहे. तेंव्हा ज्यांना ही संधी दवडायची नाही, त्यांनी उद्या संध्याकाळी दादर गाठा...