मुंबईत या ११ ठिकाणी माणसांबरोबर भूतं सुद्धा राहतात!!

अख्या जगात एक गोष्ट तुम्हाला हमखास सापडेल ती म्हणजे चटपटीत, एक्स्ट्रा मसाला मार केभुताच्या कथा! हां, आता ही वेगळी गोष्ट आहे की भूत म्हटलं की काहींची पँट ओली होते. पण काही जण तर ब्वा काँज्युरिंगसारखे सिनेमे थेटरात जाऊन बघतात  भारीच असतात असे लोक.  आपल्याकडे दहामधून ९ जणांकडे तरी भुताच्या स्टोऱ्या असतातच.  मामाच्या मुलाच्या मित्राने एकदा भूत पाहिलं होतं.. हे असलं काही फिरून फिरून आलेलं आपल्या कानावर अनेकदा पडत असतं.  या भुताच्या मामल्यामुळे रामसे बंधूंनी एक काळ गाजवला (?)  त्याबद्दल बोलायलाच नको...

आता भुताटकीचा अनुभव घेण्यासाठी काहीजण हॉरर सिनेमे पाहतात. पण लोकहो आम्ही काय म्हणतो, भूत बघायला सिनेमे का बघावेत?  जेव्हा आपल्या मुंबईतच ठिकठिकाणी भूत राहत असतील तर...... खोटं वाटतंय?...अहो, माणसांबरोबर इथे भूतही राहतात बरं का!  चला तर मग, आज जाऊया अश्याच काही जागांच्या सफरीवर.  पण एक लक्षात ठेवा राव कमजोर दिल वाले आगे ना पढे !

 

१. डिसूझा चाळ

Mahim: Haunted Places in Mumbaiस्रोत

असं म्हणतात की माहीम मध्ये अश्या विचित्र घटना होत असतात.  त्यातल्या डिसूझा चाळीबद्दल ऐकवला जाणारा किस्सा असा की, एका बाई ने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्या दिवसानंतर संध्याकाळी तिचा आत्मा या परिसरात भटकतो.

 

२. मुकेश मिल्स, कुलाबा

Mukesh Mills, Most Haunted place in Mumbaiस्रोत

मुकेश मिल्स ही जागा मूळ भुतांनीच फेमस केली आहे. १८७० साली एका आगीत भस्म मिल भस्म झाली. असं म्हणतात की आगीत हजारो लोक मेले आणि त्यानंतर ही जागा कायमची बंद झाली. पण बॉलीवूडमुळे या जागेला पुन्हा उजाळा मिळाला. मिल्सचा वापर बॉलीवूडच्या फिल्म्स शूट करण्यासाठी होऊ लागला. त्यामुळे तशी ही जागा वर्दळीची  आहे.. पण अनेक फिल्म स्टार्सनी इथे काही तरी विचित्र प्रकार असल्याचं कबूल केलंय. त्यामुळे इथली शुटींग लवकरात लवकर उरकली जाते.  कारण संध्याकाळनंतर खेळ सुरु होतो म्हणे.

(टीप : आठवा ‘ओम शांती ओम’ चा जळालेला स्टुडीओ)

 

३. आरे मिल्क कॉलनी

Aarey Milk Colony, Mumbai Haunted placesस्रोत

आरे मिल्क कॉलनी अधून मधून बिबट्यामुळे चर्चेत असते. पण इथे कायमच्या चर्चेचा विषय म्हणजे पांढऱ्या साडीतली लिफ्ट मागणारी बया! आरे कॉलनीला जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी एक बाई प्रवाश्यांना लिफ्ट मागताना दिसते असं म्हणतात. याशिवाय काहीवेळा वृध्द माणसाचा आवाज ऐकू येणं किंवा लहान मुलाचं रडणं असा प्रकार सुद्धा इथे घडला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी इथून फिरकायला अनेकांची फाटते.

(टीप : अशी पांढऱ्या  साडीतली लिफ्ट मागणारी बाई ही अफवा फक्त आरे मिल्क कॉलनी मध्ये आहे असं नव्हे. रात्रीच्यावेळी हायवे वरून प्रवास करणारे पन्नास टक्के लोकं तरी अश्याच गोष्टी सांगताना आढळतील. मुद्दा असा आहे की पांढरी साडी हा भूतांचा युनिफॉर्म वगैरे आहे की काय ?)

 

४. संजय गांधी नॅशनल पार्क

Kanheri Caves, Haunted Places in Mumbaiस्रोत

निसर्गाने वेढलेला आणि या भागात पुरातन गुफा असल्याने लोक संजय गांधी नॅशनल पार्कला भेटी देतात.  पण याशिवाय इथे काही विचित्र गोष्टी आहेत, ज्या खतरनाक असू शकतात. इथे एक प्रेत फिरत असल्याचं म्हटलं जातं, जे लोकांना रात्रीच्या वेळी लिफ्ट मागतं. याभागात रात्रीच्या वेळी अश्या घटना घडल्या असल्याचं म्हटलं जातं>  पण काहींच्या मते ही निव्वळ एक अफवा आहे.

 

५. वृंदावन सोसायटी, ठाणे

Vrindavan Society, Haunted Place in Mumbaiस्रोत

वृंदावन सोसायटीमधलं भूत तुम्हाला भूतनाथची आठवण करून देईल राव. या भुताला कानाखाली मारायला जाम आवडतं. एका माणसाने इथल्या एका इमारतीतून आत्महत्या केल्यानंतर वॉचमन बरोबर इथे काही विचित्र प्रकार घडलेलेले दिसले. जर कोणता वॉचमन ड्युटीवर असताना झोपला, तर कोणी तरी येऊन वॉट्चमनच्या खाडकन कानाखाली देतं असं म्हटलं जातं. याशिवाय इथे राहणारी माणसंसुद्धा इथल्या प्रकाराबद्दल सांगत असतात.

 

६. मुंबई हायकोर्ट

Bombay High Court Ghostly places in Mumbaiस्रोत

सुनसान जागा, निर्मनुष्य रस्ता अश्या ठिकाणी तर भूत असतं हे माहित होतं.  पण कोर्टात पण भूत असतं ? हो असतं ! मुंबई हायकोर्टात मर्डर केसचा खटला जेव्हा जेव्हा येतो,  तेव्हा असं म्हणतात की इथे एक भूत माणसांना घाबरवायला प्रगट होतं. आणि हे आजचं नाही बरं का गेल्या ३० वर्षापासूनची परंपरा आहे. पण समजा या भुताने जज्ज सायबांना केस सोडवण्यास मदत केली तर? पण तसं शक्य नाही कारण भुतांच्या परंपरेला तो काळिमा असेल राव.

 

७. पूनम चेम्बर्स, वरळी

Poonam Chambers, Mumbai haunted placesस्रोत

१९९७ साली B विंगची भिंत कोसळल्यानंतर इथे भूतांचा वावर सुरु झाला असं म्हणतात. या घटनेमध्ये जे मेले त्यांचा आत्मा इथे असल्याचं म्हटलं जातं. वॉचमनपासून ते इथे काम करणारे सर्वच याबाबत बोलताना दिसतात. दार वाजवण्याचे आवाज तसेच दारांची अपोआप होणारी उघडझाप इथे रोजचं आहे.

(टीप : पूनम चेम्बर्स समुद्राकाठी आहे. समुद्रावरून येणारे वारे थेट या बिल्डींगला धडकतात, त्यामुळे दरवाज्यांची उघडझाप होणं साहजिकच आहे. पण याला भूतांचा स्पेशल इफेक्ट म्हटलं की अफवांना एक वेगळाच रंग येतो नाही का ?)

 

८. केम्प्स कॉर्नर

Grand Paradi Towers, haunted places in Mumbaiस्रोत

ग्राँड पाराडी टॉवर हे मुंबईतल्या मलबार हिल मधलं बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेलं ठिकाण. वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध जोडप्याने आपल्या सुनेच्या छळाला कंटाळून या बिल्डींगच्या 8 व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. त्यानंतर ७ वर्षांनी त्याच घरातील मुलाने आणि त्याच सुनेने आपल्या मुलीबरोबर त्याच पद्धतीने आत्महत्या केली. बिल्डींग मध्ये काम करणाऱ्या एका बाईने देखील उडी मारून आत्महत्या केली. बिल्डींग आत्महत्येसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. १९७६ साली बिल्डींग तयार झाल्यापासून जवळ जवळ २० आत्महत्येच्या केसेस इथे झाल्या आहेत. यामुळे ग्राँड पाराडी टॉवर चांगलाच कुप्रसिद्ध आहे.

 

९. ठाण्यातली बेअरिंग कंपनी

Image result for haunted kampaniप्रातिनिधिक फोटो (स्रोत)

इथे तर थेट मूळ संस्थापकाचं भूत आहे राव. काही करणास्तव आम्ही या कंपनीचं नाव सांगू शकत नाही. इथे सांगितलेली कथा अशी की,  मूळ मालकाने अत्यंत कष्टाने ही कंपनी उभी केली आणि त्यांच्या जाण्यानंतर कंपनीत रात्रपाळीवर काम करणाऱ्या काही कामगारांबरोबर एक चमत्कारिक घटना घडू लागली, ती म्हणजे अशी की काम करताना एखादा कामगार डुलकी घेऊ लागला की एक अदृश्य हात येऊन त्याला कानफाडतो. हे मालकाचंच भूत असल्याचं म्हटलं जातं.  कारण काम चालू असताना कोणी झोपलेलं त्यांना चालत नव्हतं.

(टीप : ही घटना आणि वृंदावन सोसायटी मध्ये घडणारी घटना यात साम्य दिसून येतंय. म्हणजे या भुताच्या कथेमागे कोणा एकाचाच ‘हात’ असावा, नाही का ?)

 

१०. सेनापती बापट सर्कल, दादर

स्रोत

मंडळी इथे भूत वगैरे काही नाही पण एक चकवा जरूर आहे. दादर स्टेशन वरून या सर्कलजवळ आलात की तुम्हाला समोर तीन रस्ते आणि बाजूला गेलेला एक असे ४ रस्ते दिसतात, समजा तुम्ही एका रस्त्याने गेलात आणि येताना तुम्हाला त्याच मार्गाने परत यायचं असेल तर इथे मात्र तुमची गोची होऊ शकते. चौकाजवळून आपण नेमक्या कोणत्या रस्त्याने आलो होतो तेच कळत नाही, यामुळे अनेकजण त्याच जागेवर गोल गोल फिरत राहतात.

 

११. जुहू पवन हंस क्वार्टर्स

Juhu Pawan Hans Quarters, Mumbai's most haunted placesस्रोत

सलमा नामक एका तरुणीने १९८९ साली स्वतःला रॉकेलने पेटवून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण तिच्या बरोबरच जाळून राख झालं. पण त्या भागातल्या एका पिंपळाच्या झाडा जवळ ती आजही जळणाऱ्या अवस्थेत दिसते असं स्थानिक लोक सांगत असतात. तिच्या भीतीने 'अँथनी डिसूझा' या ख्रिश्चन माणसाने तिथे एक हनुमानाचे मंदिर उभारले. तो सांगतो त्याप्रमाणे मंदिर बांधण्याची कल्पना त्याला स्वप्नात आली.  पण मंदिर बांधण्यानेही भूत काही गेलं नाही बुवा. ती अजूनही पेटलेल्या अवस्थेत येते आणि पिंपळाच्या झाडात गडप होते.

(टीप : भुतांच्या अनेक फेवरेट जागांपैकी पिंपळाचं झाड हे एक बेस्ट ठिकाण असावं. सुट्ट्यांमध्ये भूतं कुठे जात असावीत ब्वा ?)

 

 

काही वर्षांपूर्वी एक अशी अफवा उठलेली की एक बाई रात्री अपरात्री दार ठोठावते आणि कांदा मागते. त्याकाळात कांद्याचे भाव तसेही कडाडलेले मग कोण जाऊन तिला कांदा देणार ? आम्हाला तर वाटतं की भाव वाढले म्हणूनच ती बाई फ्रीचा कांदा मागत फिरत असावी...असो. मुद्दा काय तर भुताखेताच्या कथांचं पिक हे आपल्याच डोक्यात उगवतं राव. एखाद्या घटनेकडे आपण कसे बघतो यावर ते अवलंबून असतं. तुमच्या सोबत अशी कधी 'सुपरनॅचुरल' घटना घडली आहे का ? तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच शेअर करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required