दोन्ही हात गमावलेल्या मालविकाची ही किमया तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ शिकवून जाईल..

Subscribe to Bobhata

बर्‍याचदा आपण लहानसहान गोष्टींनी खचून जातो. बाहेरून धडधाकट असतानाही निराश, दुबळं मन घेऊन हताशपणे जीवन जगत असतो. पण या जगात अनेक व्यक्ती अशाही आहेत ज्यांच्या शरिराने त्यांची साथ सोडलेली असली तरी कणखर मनोवृत्तीच्या जोरावर त्यांनी काहीतरी वेगळं केलंय. आपल्यात असणार्‍या शारिरीक व्यंगत्वावर मात करून ते त्यांचं आयुष्य मनमुराद जगत आहेत...

मालविका अय्यर ही तरूणीही अशा लोकांपैकीच एक आहे. १३ वर्षांची असताना एका बॉम्ब ब्लास्टमध्ये तिनं तिचे दोन्ही हात गमावले आहेत. पण दैवाने अचानक दिलेल्या या धक्क्यातून सावरत, अनेक शस्त्रक्रियांना सामोरं जाऊनही ती आता एक आदर्श जीवन जगत आहे. मालविका एक पीएचडी स्कॉलर आहे आणि ती समाजसेविका, मोटीव्हेशनल स्पिकर, ट्रेनर आणि मॉडेलही आहे. यासोबतच ती चेन्नईमधून ग्लोबल शेपर्स कम्युनिटीची सदस्य म्हणून काम करते. तब्बल दोन वर्षे अंथरूणाशी खिळून असणारी मालविका आता अनेक दिव्यांगांना नवी दिशा देतेय. 

मालविकाने याआधी कधीही स्वतः स्वयंपाक केला नव्हता. पण नुकतंच तिनं हे कामही हातांशिवाय करून टाकलं! आपल्या आईला फोनवरून मिक्स व्हेज करीची रेसीपी मालविकानं विचारून घेतली आणि २५ मिनीटांत तिनं ती बनवलीही. तीही अगदी स्वादिष्ट!! सोशल मिडीयावर मालविकानं ही गोष्ट आनंदाने शेअर केलीय. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध शेफ विकास खन्नांनीही तिच्यासोबत कुकिंग करण्याची इच्छा व्यक्त केलीय!

मंडळी, मालविकासारख्या प्रेरणादायी व्यक्तींकडूनच आपण जगण्याचे खरे धडे घेऊ शकतो. नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required