'रमेश' आणि 'सुरेश' बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ?
Subscribe to Bobhata
मंडळी तुम्ही एकवेळ 'फाईव्ह स्टार चॉकलेट' खाल्लं नसेल पण त्यांच्या जाहिरातीत दिसणाऱ्या रमेश आणि सुरेशला नक्कीच बघितलं असणार. आता रमेश आणि सुरेश हे प्रकरण इतकं गाजलंय की त्यावर अनेक जोक्स, मिम, फनी व्हिडीओ आले. खरं तर जाहिरातीच एवढ्या भारी असतात कि त्यांचा वेगळा जोक काय बनवणार.आता हे दोघेही फक्त फाईव्ह स्टार पुरते मर्यादित राहिलेले नाहीत राव. यांचा चेहरा सगळ्यांना माहित झालाय.
पण काय राव, या दोघांबद्दल आपल्याला काय माहीत आहे ? काहीच नाही. म्हणूनच आज आपण जाणून घेऊया रमेश सुरेश खऱ्या आयुष्यात कसे आहेत.
१. रमेश आणि सुरेश याचं खरं आयुष्यातील नाव आहे 'राणा प्रताप सेंगर' आणि 'गोल्डी दुग्गल' !!
२. दोघेही ११ वर्षापासून फाईव्ह स्टारसाठी काम करतायत.
३. राणा सेंगरला पहिल्या ऑडिशन मध्ये चक्क नाकारण्यात आलं होतं. दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा ऑडिशन ला गेला पण यावेळी त्याने आपला गेटअप बदलला होता. त्याने सगळ्यांना सांगितलं की काल जो आलेला त्याचा मी भाऊ आहे. या दुसऱ्या खेपेला त्याचं सिलेक्शन झालं.
४. राणा हा मुळात नाटकातून आला आहे तर गोल्डी हा दिग्दर्शन करता करता अभिनयात उतरला. त्याने काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.
५. शुटींग दरम्यान एका दिवसात दोघांना तब्बल ५० फाईव्ह स्टार चॉकलेट खाव्या लागतात. (मज्जाय ब्वा)
६. आत्ता पर्यंत दोघांनी तब्बल २५ टीव्ही कमर्शियल आणि २५० डिजिटल कमर्शियल मध्ये काम केलंय. यात ३० मिनिटाची शोर्ट फिल्म देखील सामील आहे.
७. गोल्डी तसा फाईव्ह स्टार च्या जाहिराती शिवाय कुठे दिसलेला नाही पण राणा अनेक टीव्ही कमर्शियल मध्ये दिसला आहे. त्याने वोडाफोन साठी देखील जाहिरात केली आहे.
८. आता ११ वर्ष एकत्र आहे म्हटल्यावर त्यांची मैत्री पक्की होणारच, जसे जाहिरातीतील रमेश सुरेश आहेत.
९. मेकअप नसेल तर दोघांनाही ओळखणं मुश्किल आहे.
१०. मेकअप नसल्याने एकदा तर चक्क कॅटबरीच्या ऑफिस मध्ये त्यांना वॉचमनने रोखलं होतं. पण गेटअप बदलून आल्यावर त्यांना आत सोडण्यात आलं.
तर मंडळी, आता समजली का पडद्या मागची खरी गोष्ट ?