लाज वाटली पाहिजे आपल्याला, रेल्वे शताब्दी आणि तेजस एक्सप्रेस मधून lcd स्क्रीन काढून टाकणारा
राव, आपण पिक्चरमध्ये बघतो युरोप-अमेरिकेतल्या मस्त ट्रेन्स, त्यात कायकाय फीचर्स असतात आणि आपली भारतीय रेल्वे कसला पकाऊ निळा डब्बा असते. पण आपल्या रेल्वेने सुद्धा कात टाकायला सुरवात केलीय. मुंबईमध्ये AC लोकल आली आणि तशीच आलीय भरपूर गाजावाजा झालेली तेजस एक्स्प्रेस.
तर तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी एक एंटरटेनमेंट स्क्रीन लावलेली आहे. या गाडीच्या पहिल्या प्रवासातच लोकांनी स्क्रीन खराब केल्या, हेडफोन्स पळवल्याची बातमी जुनी नाहीय.
या तेजस गाडीला अजून एक वर्ष पण पूर्ण झालं नाहीय आणि रेल्वेकडून बातमी आलीये की तेजस एक्स्प्रेसमध्ये LCD स्क्रीन, USB चार्जिंग पॉईंट, कॉफी व्हेंडींग मशीन अशा सुविधा देणं चुकीचं होतं. रेल्वे आता या स्क्रीन काढून टाकणार आहेत. कारण यातल्या बऱ्याचशा स्क्रीन मोडल्या आहेत, वायर तोडलेल्या आहेत, हेडफोन चोरीला गेले आहेत, आणि प्लगची बटणं काढुन नेली आहेत.
एकीकडे आपण प्रगती, विकास याबद्दल फार बोलत असतो, पण भारताचे नागरिक म्हणून आपण आपल्या जबाबदारी निभावतो का नाही हा प्रश्नच आहे!!