VFX चा वापर करताना फक्त हिरवा आणि निळा रंगच का वापरला जातो ?

राव, तुम्ही बाहुबली सिनेमा कसा तयार झाला हे पाहिलं का ? बाहुबली सिनेमाच्या मागची गोष्ट बघत असताना त्यातील अनेक दृश्य VFX चा कमाल असल्याचं दिसून येतं. बाहुबली हा चित्रपट मुळात तयार झाला आहे दमदार VFX वर. तर, बाहुबलीच्या मेकिंग व्हिडीओ मध्ये तुम्ही ते नक्कीच पाहिलं असेल....हिरवा किंवा निळ्या रंगातील बॅकग्राउंड आणि समोर घडणारं नाट्य. भल्लालदेवने बैलाला टक्कर दिली तो सीन आठवा राव.

आता मला सांगा VFX चा वापर करताना हिरवा किंवा निळा रंग का वापरला जातो ? कोणताही सुपरहिरो सिनेमा घ्या तिथे हा हिरवा आणि निळा रंग असतोच. हे दोनच रंग का वापरले जातात ?

चला समजून घेऊया.

स्रोत

आधी तर हे समजून घेतलं पाहिजे की ‘डिजिटल इमेज’ तीन रंगाने तयार होते. लाल, हिरवा आणि निळा. याच तीन रंगांची निवड VFX साठी केली जाते. पण यातील लाल रंग वापरला जात नाही, कारण लाल रंग काहीवेळा त्वचेच्या रंगाशी मिळता जुळता असू शकतो. हिरवा आणि निळा रंग सहसा कोणत्याही त्वचेशी साम्य खात नाही. म्हणून या दोन रंगांची निवड केली जाते.

VFX फक्त दृश्यातील बॅकग्राउंड बदलण्यासाठीच वापरलं जातं असं नाही. आता बाहुबलीचच उदाहरण घ्या ना, भल्लालदेव बरोबर लढणारा बैल हा संपूर्णपणे कॉम्पुटर जनरेटेड होता. म्हणजेच VFXच्या माध्यमातून संपूर्णपणे नवीन गोष्ट निर्माण सुद्धा करता येते. फक्त ते तयार करत असताना रंगांची निवड महत्वाची ठरते.

VFX किंवा अॅनिमेशनच्या कामात ‘क्रोमा कि’ वापरली जाते. क्रोमा कि वापरताना आपण समोर घडत असलेलं दृश्य हिरव्या रंगापासून वेगळं करत असतो. म्हणजेच ती जागारिकामी होत असते. हिरवा किंवा निळा रंग सहसा दृश्यातील इतर रंगांशी मिळता जुळता नसल्याने हा रंग सहज काढून टाकता येतो. आता त्या रिकाम्या जागेत आपल्याला हवं असलेलं दृश्य निर्माण करणं सोप्प असतं.

स्रोत

मंडळी याच प्रकारे आजवर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. मागून आगीचा लोळ उठलेला आहे, बाजूने बॉम्ब फुटत आहेत आणि या धुरातून (जसं काही झालेलच नाही अशा अविर्भावात) हिरो चालत येतोय. हे दृश्य खऱ्या आयुष्यात शक्य नाही बॉस. म्हणून अशावेळी VFX आणि रंगाचं हे गणित कामी येतं.

सबस्क्राईब करा

* indicates required