आयला !! चक्क तैमुर सारखा दिसणारा बाहुला आलाय भाऊ....पाह्यलात का ??
तो प्रिन्स एकदा खड्ड्यात पडला आणि आठवडाभर गाजला. पण राव, हा तैमूर अली खान काही चर्चेतून बाजूला व्हायचं नांव घेत नाही हो.. आज काय म्हणे त्याला इतक्या करोडोंची संपत्ती मिळाली असती पण ती मिळणार नाही, मग उद्या काय म्हणे हा बघा तो आईबाबासोबत फिरायला गेला तर परवा त्याच्या आयाचा पगारच इतका.. एक ना दोन!! नशीब जगात सगळ्यांना मुलं होतात, नाहीतर तैमूर जागतिक पातळीवरचा सेलेब्रिटी होऊन आपल्याला रोज त्याच्या बातम्या पाहाव्या लागल्या असत्या. थोडक्यात काय, कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा जास्त चर्चेत राहणारा गडी म्हणजे ‘तैमुर’. त्याच्या प्रत्येक हालचालीची आजकाल बातमी होते. सगळंच सांगत बसणार नाही आपण नाय तर तुम्ही आम्हाला जोड्यानं हाणाल.
आता तुम्हांला प्रश्न पडला असेल ना, आज का आम्हांला त्याची इतकी आठवण आलीय? त्याचं काय झालं, रोजच त्याच्या बातम्या यायच्या, तिथंपर्यंत ठीक होतं हो.. आज तर हाईट्ट झालीय. तैमुरसारखा दिसणारा बाहुलाच चक्क बाजारात आलाय. म्हणजे मोठ्यांना पिडल्यावर आता छोट्यांचा नंबर लागतोय की काय. कोणी बनवलाय हा बाहुला पाहा बरं??
Meanwhile at a toy store in Kerala... pic.twitter.com/J2Bl9UnPdT
— Ashvini Yardi (@AshviniYardi) November 19, 2018
केरळमधल्या एका टॉय कंपनीनं हा आगाऊपणा केलाय. त्यांनी तैमुरसारखा दिसणारा बाहुला बनवलाय. पण हा बाहुला काही अधिकृत नाही राव. तैमुरच्या लोकप्रियतेचा फायदा ही केरळची कंपनी घेत आहे. बाकी या बाहुल्याला बघून सैफिनाला मात्र प्रचंड धक्का बसलाय म्हणे. करीनाने तर ‘एखादा बाहुला आम्हालाही पाठवून द्या म्हटलंय.’ बातमी तर अशी पण आहे की लवकरच तैमुरच्या नावाचा ट्रेडमार्क रजिस्टर होणार आहे. कपूर-खान लोकांनी तैमूरला लैच लाईमलाईटमध्ये ठेवल्याचा परिणाम, दुसरं काय? आता आमची विरुष्का आणि दीपवीरला खास रिक्वेष्ट आहे की त्यांनी लवकरात लवकर तैमूरला काँपिटिशन आणि आम्हांला दुसरे पर्याय उपलब्ध करून द्यावेत..
एकंदरीत भारतीयांना तैमुरच्या नावाने अजीर्ण होत आहे. असो.... आम्हाला माहित आहे तुम्हाला तैमुरच्या बाहुल्याबद्दल काय वाटत आहे. चला, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कमेंट बॉक्स तुमचाच तर आहे.