पुण्यात बुलेट ट्रेन आहे ? फ्री मध्ये फिरता पण येतं ? पत्ता बघून घ्या राव !!
पुणेकर सध्या मेट्रोची वाट बघत आहेत, पण मेट्रो सुरु व्हायला अजून ३ वर्ष लागणार आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पुण्यात मेट्रो येण्यापुर्वीच चक्क बुलेट ट्रेन तयार झाली आहे. कुठे आहे ही बुलेट ट्रेन ? चला जाणून घेऊया !!
वाजी महाराज उद्यानात बुलेट ट्रेनची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. अगदी झेरॉक्स कॉपीच म्हणा ना. खऱ्या बुलेट ट्रेनमध्ये आणि या बुलेट ट्रेनमध्ये तसं बरंच साम्य पण आहे. हे तर काहीच नाही राव, तुम्ही या बुलेट ट्रेनमध्ये बसून फिरू पण शकता. तेही अगदी फ्री, फ्री, फ्री!!! हा पाहा व्हिडीओ...
ही बुलेट ट्रेन दरदिवशी संध्याकाळी ३ किलोमीटरची गोल फेरी मारते. एकावेळी ५० माणसं प्रवास करू शकतात. एक मात्र लक्षात घ्या, आपल्या गावाकडचे वडापवाले कसे गाडी फुल झाल्याशिवाय गाडी जागची हलवत नाहीत, तसंच या ट्रेनचं पण आहे. ५० माणसं बसल्याशिवाय ट्रेन हलत नाही, पण याची गरजच पडत नाही ना राव!! ट्रेनची प्रसिद्धीच एवढी आहे की लोक आत बसायला रांगा लावतात.
तर मंडळी, २०२३ ला खरी बुलेट ट्रेन येईपर्यंत एक फ्री राईड घ्यायला नक्कीच हरकत नाही. मग कधी जाताय पुण्याला??
पत्ता : राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वडगाव शेरी
वेळ : संध्याकाळी ५ ते ८. ट्रेन ६.३० ला सुरु होते.
आणखी वाचा :
पुण्यात झणझणीत आणि चटकदार मिसळ मिळण्याची ही २० अफलातून ठिकाणं...बघताय काय, व्हा सामील !!
पुणेकरांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक गुप्त भुयार आहे, माहित्ये आहे का ??