या सीझनमध्ये ट्राय करायलाच हवेत हे ६ बेस्ट इंडियन लूक्स.. ५व्या लूकच्या तर तुम्ही प्रेमातच पडाल!!
मंडळी, सध्या लग्नसराई आणि साखरपुड्याचे दिवस आहेत. झालंच तर दोनचार महिन्यांत गौरी-गणपती यायचीही वेळ येऊन ठेपते. त्यामुळं महिलावर्गासाठी नव्या कपड्यांची खरेदी आणि ठेवणीतले कपडे बाहेर काढायची हक्काची वेळ झालीय. इतरांच्या घरी समारंभाला जायचं असेल, तर आपलं वेगळेपण खूप भपका न करता उठून दिसायला हवं ही तर सगळयांची अपेक्षा असते. पण, आपल्या घरचं कार्य असेल तर वेगळेपण आणि उठून दिसणं दोन्ही झोकात व्हायलाच लागतं!! खरं की नाही??
आता मग छान नवे पारंपरिक कपडेही हवेत, पण त्यात मॉडर्नही दिसायला हवं, आपली फॅशन थोडी वेगळीही हवी आणि त्यात प्रत्येक कार्यक्रमाला वेगळे कपडे-वेगळा लूकही हवा... हे सगळं साधायचं कसं?? चिंताच नको, आम्ही आहोत ना.. खास आमच्या वाचकमैत्रिणींसाठी आणि पुरुषवाचकांच्या मैत्रीणींसाठी बोभाटा घेऊन आले आहे पारंपरिक आणि मॉडर्न असे ७ वेगवेगळे सदाबहार ठरतील असे लूक्स. साखरपुडा, मेहंदी, हळद, लग्नाच्या आधी-लग्न लागताना-रिसेप्शन ते अगदी सत्यनारायणापर्यंत फुलटू तयारी होईल पाहा..
१ इंडोवेस्टर्न गाऊन्स
सध्या या अशा गाऊन्सची सॉलिड फॅशन आलीय. एम्ब्रॉयडरी, जरदोसी वर्क केलेले किंवा पारंपरिक बुट्ट्या असलेले हे गाऊन्स भारी दिसतात.
हवी तर ओढणी घ्या किंवा नुसताच गाऊन घाला, दोन्ही छान दिसतं. या गाऊनसोबत नेट मटेरियलच्या किंवा बनारसी ओढण्या घेतल्या जातात.
यात ओढणीऐवजी केप किंवा जॅकेट असलेले गाऊन्सही उपलब्ध आहेत.
बऱ्याच उंच मुलींना त्यांच्या उंचीचे कपडे किंवा साडया मिळत नाहीत. हे असले गाऊन्स विकणारे अशा मुलींसाठी मध्ये नेटचा बेल्ट लावून गाऊनची उंची वाढवून देतात. जोड दिलाय असं कळतही नाही बरं!!अशा गाऊनवर फक्त मोठे कानातले घातले की काम झालं.
२. स्कर्ट टॉप
आजकाल आपण जास्त उत्सवप्रिय झालो आहोत. त्यामुळं मेंदी आणि संगीतसारखे तसे मराठी लोकांमध्ये नसलेले प्रकार आजकाल आपल्यातही सर्रास होतात. तर ते असो..
मेंदीसारख्या कार्यक्रमात ओढणीची अडचण नको आणि मेहंदी काढण्यासाठी सुटसुटीत कपडेही हवेत. त्यामुळं शक्यतो स्कर्ट टॉपला पसंती द्यावी हे उत्तम!! यातही बरेच ऑप्शन्स आहेत बरं..
अनुष्का शर्माने तिच्या लग्नाच्या मेहंदीला घातला तसा फुलांच्या प्रिंटचा ब्लाउज आणि मस्त व्हायब्रन्ट कलरचा स्कर्ट किंवा प्लेन क्रॉप टॉप आणि हेवी एम्ब्रॉयडरी केलेला हॉट पिंक कलरचा घेरदार स्कर्ट, किंवा प्रिंट ऑन प्रिंट असा एकाच कापडातला स्कर्ट आणि टॉप! सगळेच प्रकार मस्त दिसतील..
थोड्या सुटलेल्या पोटामुळं क्रॉप टॉप घालणं शक्य नसेल तरीही हरकत नाही, पेपलम टॉप अशा आपल्यासारख्या लोकांसाठीच आहेत.. त्यावर घेरदार स्कर्ट घाला आणि मस्त मिरवा.
ते ही शक्य नसेल, तर लांब कुर्त्यावरही घेरदार स्कर्टचा पर्याय आहेच की हो तुमच्याकडे. त्यातही प्रिंट ऑन कॉन्ट्रास्ट प्रिंट किंवा प्लेन- प्रिंट हे दोन्ही प्रकार ट्राय करता येतील.
काहीही करा, पण ओढणीला मात्र फाटा द्या बुवा..
३. सिल्क कुर्ता विथ पॅन्टस
सध्या जमाना पालाझो आणि स्ट्रेट पॅन्टसचा आहे. तशी तर दीपिका आणि आलियाने गराराची फॅशनपण परत आणलीय, पण ते पाहताना थेट पाकीजासारख्या सिनेमांचीच आठवण जास्त येते.
पण पसंद अपनी अपनी. उंच मुलींना हे गरारा चांगले दिसतात.
प्लेन सिल्क कुर्त्यावर कॉन्ट्रास्ट स्ट्रेट पॅन्टस आणि हेवी दुपट्टा घेतलात तर भारी दिसेल. त्यातही हे मिक्स अँड मॅच असल्याने नंतर हा कुर्ता, पॅन्ट आणि ओढणी हे सगळं दुसऱ्या कशासोबतही पेअर करून वेगळा लुक क्रिएट करता येईल हे आहेच.
ओढण्यांत बनारसी, गोटापट्टी वर्क केलेली राजस्थानी बांधणी, फुलकारी, कांथा असे बरेच पर्याय आहेत. हळदीच्या कार्यक्रमाला हा पोशाख खुलून दिसेल.
४. क्लासिक पांरपरिक साडी
हे गाऊन्स येवोत की पलाझो, साडी ही फॅशनच्या दुनियेतली अजरामर गोष्ट आहे, तिला कधीच मरण येणार नाही.
लग्नाच्या वेळेस तर तमाम महिलावर्गच काय, चिल्ल्यापिल्ल्या पण साडीलाच पसंती देतात. साड्यांमध्ये व्हारायटीपण इतकी असते की कुणाला तिचा कंटाळा येत नाही.
तुम्ही घरच्या सगळ्या बायका पैठण्या किंवा नऊवारी नेसून धमाल उडवू शकता. त्यावर मग पारंपरिक दागिने घातलेत तर मग काय बोलायलाच नको. सगळ्याजणी बनारसी शालू नेसू शकता, कांजीवरम, पेशवाई.. ऑप्शन्स खूप आहेत हो.
सगळ्यांनी असा बँडबाजा करायची गरज नसली तरी असे केल्यास जाम मजा येते.
५. साडी इन मॉडर्न अवतार
नाही नाही, ते पॅन्टवर साडी नेसणे वगैरे प्रकार नाही हो, आपली नेहमीची साडी थोड्या वेगळ्या प्रकारे नेसूनही तुम्ही तुमचे वेगळेपण दाखवू शकता..
रिसेप्शनला साडीतच तुम्ही थोडा वेगळा लूक करु शकता. म्हणजे बघा, डॉली जैन काही तुम्हांला साडी नेसवायला येऊ शकत नाही. तिच्या नुसत्या साडी नेसवण्याच्या बजेटमध्ये एका बाईच्या सगळ्या फंक्शनच्या साड्या घेऊनसुद्धा थोडे रुपये शिल्लक राहतील. डॉलीबाई नसल्या म्हणून काय झाले? अशी वेगळ्या पॅटर्नची कांजीवरम नेसता येईल.
कशी वाटतेय ही कांजिवरम?
अशा पद्धतीची साडी कशी नेसायची याचा व्हिडिओ इथे पाहा-
प्लेन सोनेरी लेहंगा स्कर्ट आणि ब्लाऊनजवर उलट्या साईडने साडी नेसूनही वेगळा लूक क्रिएट करता येईल.
स्कर्ट नसेल तरी काही हरकत नाही, एका साडीचा लेहेंगा आणि दुसरी साडी ओढणीसारखी घेता येईल.
त्याच त्या जुन्या साड्या असल्या तरी या अशा वेगळ्या लूक्समुळे त्या एकदम वेगळ्याच भासतील.
६. लेहेंगा
या सगळ्या धामधुमीत एका वेळेस तुम्ही लेहेंगाही नक्कीच घालू शकाल. फक्त एक करा, तुमचं स्वत:चं लग्न असेल आणि डोक्यावर ओढणी घेणं मस्ट असेल तर दोन ओढण्या वापरा, एक गुजराती पद्धतीने घ्या तर दुसरी डोक्यावरून घ्या.
डोक्यावरुन ओढणी घेणं गरजेचं नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दुपट्टा ड्रेप करु शकता.
मग, कधी काय घालायचे, कोणता लूक ट्राय करायचा हे ठरलं का? यातल्या कोणत्या आयडिया तुम्हांला आवडल्या ते आम्हांला आवर्जून सांगा. तसेच, तुमच्याकडच्या आयडिया आमच्यासोबत शेअर करा. आम्ही पुढच्या लेखात त्यांचा समावेश नक्कीच करु.
आणखी वाचा :
या बाई प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी आणि दीपिका पादुकोणला साडी नेसवतात....असं घडलं त्यांचं करिअर !!
तुमच्या सुंदर रेशमी साड्यांना पुन्हा उपयोगात आणण्याच्या ८ हटके आयडिया..
तुमच्या सुंदर साड्यांना पुन्हा उपयोगात आणायच्या २५ सॉलीड आयडियाज..
सासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने !!
बिहारमध्ये दारुबंदीमुळं वाढलाय महागड्या साड्यांचा खप!! किती? विश्वास बसणार नाही, इतका!!
तुमचा वॉर्डरोब सजवा जॅकेट ब्लाऊजसोबत.. पाहा जॅकेट ब्लाऊजचे एक से बढकर एक १३ प्रकार..
रेशमाचे धागे ते साडी -पाहा प्रवास
या १० प्रकारच्या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात