computer

व्हिडीओ स्टोरी: उत्साही पर्यटकांनो हिमाचल प्रदेशच्या भयंकर पावसाची ही दृश्ये पाहिलीत का?

काही दिवस थांबलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे. हा जोर सर्वात जास्त दिसला तो हिमाचल प्रदेशात. हिमाचल प्रदेशात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी तिथल्या भयंकर पावसाची आणि पुराची दृश्यं सोशल मिडीयावर शेअर केली आहेत. ही एक झलक बघा.

आणखी दृश्यं बघण्यापूर्वी हिमाचल प्रदेशात नक्की काय घडलं आहे जाणून घेऊया.

रविवारच्या रात्री कांगरा जिल्ह्याच्या धर्मशाला भागात पावसाने गाड्यांसह इमारतींनाही वाहून नेलं. गाव खेड्यांत तर सामान्य नागरिकांची शेकडो घरे वाहून गेली आहेत. एवढंच नाही तर पावसाचा जोर एवढा होता की झाडेही मुळासकट कोसळली. सुरुवातीला आलेल्या बातमीनुसार शाहपूर भागात तीन लोकांचा मृत्यू झाला तर जवळावळ नऊ लोक बेपत्ता झाले. या नऊ लोकांना शोधण्यासाठी NDRF ची टीम काम करत आहे.

हवामान खात्याचे प्रमुख मनमोहन सिंग यांनी संपूर्ण हिमाचल प्रदेशात स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना नदीच्या जवळपास जाण्यास सक्त मनाई केली आहे. १४ आणि १५ जुलै या तारखांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एकंदरीत परिस्थिती पाहता मानली, शिमला आणि धर्मशाला भागात फिरायला जाणाऱ्या उत्साही पर्यटकांनी तूर्तास तरी घरीच थांबलेलं बरं. जर कोणाला वाटत असेल की, कोरोना काय, पाऊसही आमचं काही बिघडवू शकत नाही, तर त्यांनी हिमाचलच्या पावसाची ही दृश्यं नक्कीच पाहायला हवीत.

 

 

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required