computer

इतिहास -व्यापार -उद्योग आणि आधुनिक अशा अनेक रंगांचा जिल्हा - औरंगाबाद

मराठवाड्यातील महत्वाचा जिल्हा असलेला औरंगाबाद आपल्या वैविध्याने पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. औद्योगिक प्रगतीच्या बाबतीत पण औरंगाबाद महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रातील याच महत्वपूर्ण जिल्ह्याची माहिती आज आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

औरंगाबादचा इतिहास खूप जुना आहे. कधीकाळी हा जिल्हा नगरचा प्रधानमंत्री मलिक अंबरने आपली राजधानी म्हणून निवडला होता. मलिक अंबर हा शहा मूर्तजा निजामचा प्रधानमंत्री होता. त्यावेळी औरंगाबादचे नाव खडकी असे होते. मलिक अंबरच्या काळात खडकीचे महत्व वाढले होते. मुघलांच्या ताब्यात खडकी गेल्यावर औरंगाबादने याचे नाव बदलून औरंगाबाद असे केले. खडकीचे नाव औरंगजेबच्या आधी फतेहनगर असे करण्यात आले होते.

औरंगाबाद जिल्ह्याच्या भौगोलिक बाबींबद्दल बोलायचे झाल्यास हा जिल्हा गोदावरी नदीने वेढला आहे. गोदावरीप्रमाणे तापी, पूर्णा, शिव या नद्या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील गोदावरीच्या उपनद्या म्हणजे गिरजा, दुधा, गलहती या आहेत. कन्नड डोंगरावरून शिवना ही नदी वाहते तर पूर्णा ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कन्नड या तालुक्यात उगम पावते.

जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातमाळा अजिंठा ही डोंगररांग आहे. सातमाळाची एक शाखा असलेली जालनारांग जिल्ह्याच्या मध्यभागात आहे. त्याचप्रमाणे ज्योत्स्ना, चौका, दौलताबाद असे डोंगर आहेत. खनिजांचा विचार करायचा झाल्यास चुनखडी आणि बांधकामासाठी महत्वाचे असे दगड येथे सापडतात. जिल्ह्यातील काही भागात चंदन देखील आहे.

पिकांच्या बाबतीत काळ्या जमिनीमुळे कापूस चांगल्या प्रमाणावर घेतला जातो. तर ज्वारी हे जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे. गहू शेतीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. मोसंबी, चिकू, संत्री, लिंबू, द्राक्ष असे फळांचे पीक याठिकाणी घेतले जाते. औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र आहे तर बदनापूर येथे कापूस आणि गहू संशोधन केंद्र आहेत.

गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले नाथसागर हे प्रचंड धरण आहे. दळणवळणासाठी मोठा महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग २११ हा आहे. तसेच औरंगाबाद येथे असलेले विमानतळ जिल्ह्याला इतर शहरांशी जलदगतीने जोडते. औद्योगिक विकास या जिल्ह्यात चांगला झाला आहे. व्हिडीओकॉन, बजाज ऑटो, स्कोडा, धुत ट्रान्समिशन अशा कंपन्या या ठिकाणी आहेत.

पर्यटनाच्या बाबतीत या जिल्ह्याची ख्याती जागतिक स्तरावर आहे. औरंगाबादपासून १०० किलोमीटर असणाऱ्या वाघूर नदीच्या परिसरात अजिंठा लेण्या आहेत. येथे २९ बौद्ध लेणी आहेत. या लेण्या इसवीसनाच्या आधी दुसरे ते चौथे शतक या दरम्यान तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. तर वेरूळच्या लेण्या इसवीसन ५ ते १० या कालखंडात तयार झाल्याची माहिती आहे. वेलोराचे महत्व अजिंठा सारखेच असून या ठिकाणी बौद्ध, हिंदू, जैन संस्कृतीचे दर्शन होते. वेरूळ औरंगाबादपासून ३० किमी आहे. अजिंठा वेलोरा या गुफा युनोस्कोसाठी वैश्विक ठेवा आहेत.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेला यादवकालीन देवगिरी किल्ला पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून पर्यटक येतात. यादवांच्या काळात देवगिरी हे सत्तेचे प्रमुख केंद्र समजले जात असे. घृष्णेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले ज्योतिर्लिंग धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले पैठण सुद्धा जिल्ह्यासाठी महत्वाचा ठेवा आहे.

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांजवळ नक्की शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required