'पास बैठो तबियत बहल जायेगी ,मौत भी आ गई हो तो टल जायेगी'.
प्रत्येक गाण्याला एक खास 'फॅमिली हिस्ट्री' असते. या फॅमिलीत गायक -गायिका किंवा दोघंही असतात.,गाण्याची चाल बांधणारा संगीत दिग्दर्शक असतो आणि शब्दांकीत करणारा गीतकार असतो. सगळ्यांचे हक्क या गाण्यावर असतात. ही झाली फॅमिली पण प्रत्येक गाण्याच्या फॅमिली हिस्ट्रीत एक कथा पण गुंफलेली असते. आज अशाच एका जुन्या गाण्याची कथा आपण वाचूया.
सी.अर्जुन या संगीतकाराचं नाव फारसं कोणालाही आठवणार नाही.हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सिनेमांना त्यांनी गाणी दिली होती. माझ्या आठवणीतला त्यांचा शेवटचा चित्रपट सुपरड्युपर हिट्ट झाला, लहान थोर ,पोरंसोरं सगळेच त्या चित्रपटाची गाणी पुढची दहा बारा वर्षं गात होते. तो चित्रपट म्हणजे ' जय संतोषी माँ ' ! पण कोणीही विचारलं नाही की गाण्याच्या चाली कोणी दिल्या.
मातेचा प्रकोप दुसरं काय ?
माझ्या वयाच्या काका लोकांना मात्र त्यांची दोन गाणी जीवापाड आवडीची आहेत. एक म्हणजे महंमद रफी आणि तलत मेहमूद यांचं ' गम की अंधेरी रात में, दिल को न बेकरार कर ,सुबह जरूर आयेगी ' आणि दुसरं म्हणजे ' पास बैठो तबियत बहल जायेगी ,मौत भी आ गई हो तो टल जायेगी'.
या दुसऱ्या गाण्याची एक स्टोरी आहे. एकदा गीतकार इंदीवर आणि सी.अर्जुन दोघं बसमधून घरी परतत होते. एक सुंदर मुलगी त्यांच्याजवळ उभी होती. इंदीवर बराच वेळ तिच्याकडे बघत विचार करत होते. शेवटी काही वेळाने त्यांनी सी. अर्जुनना उठून उभे राहा आणि त्या मुलीला माझ्या शेजारी बसू द्या अशी विनंती केली. ते उभे राहीले आणि मुलगी इंदीवर यांच्याजवळ बसली.आणि काही वेळातच या गाण्याच्या मुखड्याचा जन्म झाला.
'पास बैठो तबियत बहल जायेगी ,
मौत भी आ गई हो तो टल जायेगी'
हमने माना के छाई है काली घटा
गोरे गालों से गेसू हटा दो ज़रा
इस अंधेरे में एक शम्मा जल जाएगी '
'पास बैठो तबियत बहल जाएगी
मौत भी आ गई हो तो टल जाएगी'.
आता ही कथा आवडली असेल तर हे गाणं पण ऐका