Ind vs Aus 3rd test: इंदोरच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करणारे टॉप -५ फलंदाज अन् गोलंदाज
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी पाहूया इंदौरच्या सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक गडी बाद करणारे टॉप -४ खेळाडू.
इंदौरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..
इंदौरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे. अजिंक्य रहाणेने २ कसोटी सामन्यातील ३ इनिंगमध्ये १४८.५० च्या सरासरीने २९७ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी मयांक अगरवाल आहे. त्याने आतापर्यंत २४३ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने ३ इनिंगमध्ये २४८ धावा केल्या आहेत. तर या मैदानावर १९६ धावा ठोकणारा चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानी आहे. तसेच बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमने या मैदानावर १०७ धावा केल्या आहेत.
टॉप ५ फलंदाज..
अजिंक्य रहाणे -२९७ धावा
मयांक अगरवाल -२४३ धावा
विराट कोहली -२२८ धावा
चेतेश्वर पुजारा -१९६ धावा
मुश्फिकुर रहीम -१०७ धावा
इंदौरमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे टॉप ५ फलंदाज...
इंदौरच्या मैदानावर सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आर अश्विनच्या नावे आहे. अश्विनने २ सामन्यांच्या ४ इनिंगमध्ये १८ गडी बाद केले आहेत. मोहम्मद शमी ७ गडी बाद करण्यासह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेश यादवने ५ गडी बाद केले आहेत. यानंतर रवींद्र जडेजा, अबू जायद आणि जीतन पटेल यांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले आहेत. तर ईशांत शर्माच्या नावे ३ गडी बाद करण्याची नोंद आहे.
आर अश्विन - १८ गडी बाद
मोहम्मद शमी - ७ गडी बाद
उमेश यादव - ५ गडी बाद
रवींद्र जडेजा, अबू जायद, जीतन पटेल - ४ गडी बाद
इशांत शर्मा - ३ गडी बाद
काय वाटतं, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार का? कमेंट करून नक्की कळवा.