सावध रहा-चोरपावलांनी कर्करोगाचे आगमन होण्याचे प्रमाण वाढत जात आहे.
सगळं काही व्यवस्थित चाललं असतं .अचानक एखादा मेसेज येतो - कोणीतरी फोन करतं आणि कळतं की आपल्यापैकीच कोणालातरी कॅन्सर असल्यावे वैद्यकीय निदान झाले आहे. सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसत नाही कारण अगदी धडधाकट -निरोगी माणसाला आपण भेटत असतो- नियमित संपर्कात असतो.मग एकच प्रश्न मनाला छळत राहतो की यांना आधी हे कळलं नसेल का ? पाठोपाठ दुसर प्रश्न उभा राहतोच की आज आपण एकदम ओक्के आहोत, उद्या असंच काही आपल्याला.......?
गेल्या काही वर्षात अशा प्रकारे चोरपावलांनी कर्करोगाचे आगमन होण्याचे प्रमाण वाढत जात आहे.वरवर पाहता ठणठणीत असलेली तब्येत अचानक ढासळायला सुरुवात होते.आजच्या आपल्या लेखात कर्करोगाच्या अशाच काही लक्षणांचा विचार करणार आहोत ज्यामुळे योग्य वेळीच उपचाराला सुरुवात करता येईल.
अनेकदा कर्करोगाची लक्षणे आधीच्या काळात दिसत नाहीत किंवा दिसली तरी ती एरवी आढळणाऱ्या लक्षणांसारखीच असतात. त्यामुळे रुग्णाला स्वतःला हा आजार झालाय, ह्याची कल्पनाच नसते. वेळीच उपचार न मिळाल्याने घातक ठरते. साधारणतः शरीराला अत्यंत आतल्या भागात अशा कर्करोगाची लागण होत असते.
त्यामुळेच सर्व प्रकारच्या कर्करोगात silent cancers हे सर्वात घातक ठरवले गेले आहेत.हे कर्करोग ५ प्रकारचे असतात.
१ स्वादुपिंडाचा कर्करोग
स्वादुपिंडाच्या कर्करोगात त्याच्या आतील भागातील पेशी अनिर्बंध वाढायला लागून त्याच्या गाठी व्हायला
लागतात. साधारण वयवर्ष ६५ आणि त्या वरील वयाच्या ज्येष्ठांमध्ये हा कर्करोग आढळतो. धूम्रपान, मधुमेह, कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यास हा कर्करोग होऊ शकतो.
ह्या कर्करोगाची लक्षणे ….
सारखे आजारी वाटणे.
विनाकारण वजन कमी होणे.
पोटात दुखणे.
काविळीची लक्षणे.
जलोदर होणे.
मूत्र अतिशय गडद रंगाचे होणे.
थकवा जाणवणे.
२ यकृताचा कर्करोग
यकृताला अनेक प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यातला अनेकांमध्ये हेपॅटिक कर्करोग बऱ्याचदा निदर्शनास येतो.
यकृताच्या कर्करोगाची लक्षणे …
विनाकारण वजन उतरणे.
भूक मरणे.
पोटाच्या वरच्या भागात दुखणे.
मळमळ आणि उलट्या
थकवा जाणवणे.
पोटावर सुजणे.
कावीळ
शौचास पांढरट होणे.
३ योनीमार्ग आणि गर्भाशय यांना जोडणाऱ्या ग्रीवेचा कर्करोग
योनीमार्ग आणि गर्भाशय यांना जोडणाऱ्या ग्रीवेचा कर्करोग बहुतेकवेळा human papilloma virus मुळे
होतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
ह्या कर्करोगाची लक्षणे ….
शरीसंबंधा नंतर किँवा 2 मासिक ऋतू मध्ये किंवा रजोनिवृत्ती नंतर रक्तस्त्राव होणे .
सारखे दुर्गंधीयुक्त पाणी किंवा रक्त जाणे.
ओटीपोटात वेदना होणे.
अंडाशयाचा कर्करोग हा अमेरिकन कर्करोग संस्थेच्या अभ्यासानुसार बायकांना होणाऱ्या कर्करोगात पाचवा
आहे ज्यात त्यांचा मृत्यू होतो.
अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे …
ओटीपोटात दुखणे. अंगावर सारखी सूज येणे.
सारखे लघवीला लागणे.
आतड्याच्या सवयी मध्ये बदल होणे.
ओटीपोटात दुखणे.
विनाकारण वजन कमी होणे.
४ अंडाशयाचा कर्करोग
अंडाशयाचा कर्करोग हा अमेरिकन कर्करोग संस्थेच्या अभ्यासानुसार बायकांना होणाऱ्या कर्करोगात पाचवा आहे ज्यात त्यांचा मृत्यू होतो.
अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे …
ओटीपोटात दुखणे. अंगावर सारखी सूज येणे.
सारखे लघवीला लागणे.
आतड्याच्या सवयी मध्ये बदल होणे.
ओटीपोटात दुखणे.
विनाकारण वजन कमी होणे.
५ मोठ्या आतड्याचा कर्करोग …..
मोठ्या आतड्यात छोटे छोटे मांसाच्या गोळ्यांचे एकत्रीकरण व्यायला लागते आणि हा कर्करोग लक्षात
येतो.
मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे …
आतड्याच्या सवयी मध्ये अतिसार किंवा बद्घकोष्टता असा बदल होणे.
शौचामध्ये रक्त पडणे.
पोटात सारखे दुखणे.
शौचास साफ होत नसल्याची भावना.
मळमळ आणि थकवा.
विनाकारण वजन घटणे.
थोडक्यात वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. शरीरात अचानक काही बदल
जाणवले, जेवणा खाण्याच्या सवयी बदलल्या, वजन अचानक आपोआप कमी व्ह्यायाला लागले, थकवा
जाणवला की सगळ्यात पहिले डॉक्टरांना भेटावे. अंगावर आजार काढू नये आणि स्वतःचे स्वतः
औषधपाणी करू नये.
आपले शरीर, आपली संपत्ती.
-रमा ताम्हनकर