Richest Cricketers in world: श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत भारताचे वर्चस्व संपले! केवळ १ सामना खेळलेला पाकचा फलंदाज आहे विराटच्या पुढे..
बीसीसीआय हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. तसेच भारतातील क्रिकेटपटूंची फॅन फॉलोइंगही चांगली आहे. भारतीय क्रिकेटपटूंचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. भारतीय क्रिकेटपटूंची लाईफस्टाईल पाहून तुम्हालाही वाटत असेल की, भारतीय क्रिकेटपटूच जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. मात्र हा तुमचा गैरसमज आहे. या यादीत पाकिस्तानचा खेळाडू अव्वल स्थानी आहे. चला तर पाहूया कोण आहेत टॉप ५ श्रीमंत खेळाडू.
विराट कोहली:
या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. विराट हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू नसून त्याच्यापुढे आणखी चार क्रिकेटपटू आहेत. स्पोर्ट्स ब्रीफच्या अहवालानुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती १२२ मिलियन डॉलर आहे. मात्र येणाऱ्या काळात या संपत्तीत आणखी भर पडू शकते.
एमएस धोनी :
एमएस धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय कर्णधारांपैकी एक आहे. त्याने भारतीय संघाला २००७ टी -२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून दिला होता. १२५ मिलियन डॉलरची संपत्ती असलेला एमएस धोनी या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. त्यामुळे तो केवळ आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत असतो.
सचिन तेंडुलकर:
सचिन तेंडुलकर हा शतकांचे शतक पूर्ण करणारा एकमेव फलंदाज आहे. तब्बल २४ वर्ष त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनची एकूण संपत्ती १६५ मिलियन डॉलर इतकी आहे.
ऍडम गिलख्रिस्ट:
सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ऍडम गिलख्रिस्टचं नाव वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? मात्र हे खरं आहे. ऍडम गिलख्रिस्ट हा ३८० मिलियन डॉलर इतक्या संपत्तीचा मालक आहे. तो ऑस्ट्रेलियाचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू देखील आहे.
नवाज शरीफ:
क्रिकेट चाहत्यांना नवाज शरीफ यांचं नाव पाहूनही आश्चर्याचा धक्का बसला असेल. हे खूप कमी लोकांना माहीत असेल की, पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ हे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत.
१९७३-७४ मध्ये ते रेल्वे संघाकडून पाकिस्तान एअरलाइन्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाज म्हणून उतरले होते. या सामन्यात ते शून्यावर बाद झाले. त्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरलेच नाही. त्यांची एकूण संपत्ती १.६ बिलियन इतकी आहे. मात्र हा पैसा त्यांनी क्रिकेटमधून नव्हे तर राजकारणातून आणि व्यवसायातून कमावला आहे. प्रधानमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.