रहकीम कॉर्नवॉल- वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा १४० किलो वजनाचा पैलवान !
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे.वेस्ट इंडिजमध्ये हा संघ २कसोटी सामने , ३एक दिवसीय आणि पाच T-20 सामने खेळेल.भारतीय टीममध्ये नेहमीचे दिग्गज खेळाडू तर आहेतच पण सध्या चर्चा आहे ती वेस्ट इंडिजच्या रहकीम रशॉन शेन कॉर्नवॉल याची. (Rahkeem Rashawn Shane Cornwall ) ही चर्चा जास्त असण्याचे कारण म्हणजे या खेळाडूचे वजन तब्बल १४० किलो आहे.सगळ्यात महत्वाचे असे की या १४० किलो वजनामुळे त्याने एक प्रकारचा विक्रम प्रस्थापित केला आहे. जगातील सर्वात जास्त वजन असणारा क्रिकेटपटू हा भीम पराक्रम त्याच्या नावावर आहे.
१ फेब्रुवारी १९९३ साली जन्मलेला हा क्रिकेटर राईट आर्म ऑफ ब्रेक (Right arm Off break) बॉलर आहे. कॉर्नवॉल हा लीवर्ड इस्लांड क्रिकेट संघातून खेळतो. ३० ऑगस्ट २०१९ साली भारताविरुद्ध पदार्पण केलेल्या या खेळाडूने ९ टेस्ट मॅच मध्ये १८.३० सरासरीने २३८ धावा करून ३४ विकेट्स घेतल्या आहेत.५ विकेट घेण्याची कामगिरी २ वेळा आणि १० विकेट घेण्याची कामगिरी एकदा केली आहे.
१९७५ आणि १९७९ साली ५० शतकांचा विश्वकरंडक उंचावणार्या विंडीज संघाचा क्रिकेट विश्वात खूप सारा दबदबा होता. त्यांचे बॉलर्सची उंची आणि त्यांचे बाउन्सर पाहता भल्या भल्या खेळाडूंची भंबेरी उडायची. पण तो दरारा सध्या दिसत नाही. या लेखाचा उद्देश हाच की, कुणाच्याही शरीर यष्टीवर न जाता अशा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा द्या. खूप सारे क्रिकेटप्रेमी या प्लेअरची चेष्टा पण करतील पण असो! टेस्ट मॅचमध्ये जास्तीत जास्त विकेट पटकावून हा खेळाडू सामन्यामध्ये थोडी तरी रंगत आणेल हीच एक क्रिकेट प्रेमी म्हणून अपेक्षा आपण करू या !
- मंगेश गुरव
लेखक कोल्हापूर येथे BPO कर्मचारी आहेत आणि त्यापूर्वी मुंबईत पत्रकारीता करत होते.