६०७० मीटर उंच गिरीशिखरावर भारताचा स्वतंत्रता दिवस साजरा केला !!
लडाख मधील माउंट युटी कांग्री ६०७० मीटर उंचीचे शिखर सर करत भारताचा ७७ वा स्वतंत्रता दिवस भारतीय ध्वजाचे ध्वजतोरण फडकावून साजरा करण्याची कामगिरी महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी केली.या टीममध्ये मुंबईतील गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि सोलापूर मधील गिर्यारोहक बालकृष्ण जाधव, निलेश माने (कल्याण) यांचा समावेश होता.
गतवर्षी या टीमने देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात पदार्पण करत असताना माउंट युनाम (६१११ मी.) वरती आणि स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर माउंट जो जंगो (६२५० मी.) आणि कांग यात्से-२ (६२४० मी.) या शिखरांवर ७५ भारतीय ध्वजाचे ध्वज तोरण फडकावत भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिवस साजरा केला होता.
तत्पूर्वी निलेश माने आणि वैभव ऐवळे यांनी आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखरे माउंट किलीमांजारो (५८९५ मी.) आणि माउंट एलब्रूस (५६४२ मी.) सर करून अनुक्रमे ७२ आणि ७३ भारतीय ध्वजांचं ध्वज-तोरण फडकावत ७२ आणि ७३ वा स्वतंत्रता दिवस साजरा केला होता,ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
वैभव ऐवळे यांनी त्या गिरीशिखरावर चित्रित केलेला व्हिडिओ बोभाटाच्या फेसबुक पेजवर काहीच मिनिटात !!
हाच व्हिडिओ तुम्ही बोभाटाच्या इन्स्टाग्रामवर पण बघू शकता.
https://www.instagram.com/bobhatamarathi/reels/
https://www.instagram.com/reel/Cv_fxT6LhUW/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==