computer

माणसे आत्महत्या का करतात ?

माणसे आत्महत्या का करतात ? नैराश्यानी ग्रस्त झाल्यावर -मानसिक तोल ढळल्यावर ? त्यांच्या मदतीच्या हाका कुणाच्याही कानावर न पडल्यावर ? त्यांनी केलेल्या चुकांचा मानसीक भार सहन होईनासा झाल्यावर ? की मृत्यु हा एकच  तर्कसंगत मार्ग आहे याची खात्री पटल्यावर ?
प्रश्नचिन्हा सोबत वर दिलेली सगळी कारणे खरी आहेत आणि काही वेळा खोटीही वाटतात. आत्महत्या ही निवड नाही तर दु:ख सहन करण्याची ताकद संपण्याचे लक्षण आहे.

कॅन्सर सारख्या रोगाच्या शेवटच्या टप्प्यात वेदना सहन करण्याची शक्ती संपल्यावर केलेली आत्महत्या नातेवाईकांना तर्कसंगत वाटते ती  दुखणाईताची सुटका झाली म्हणून की त्यांचीच मानसिक वेदनेतून सुटका झाली म्हणून ?

समजा तुम्ही सत्ताविसाव्या मजल्यावर एकाकी आहात.इमारतीला आग लागली आहे .आगीचे लोळ सव्वीसाव्या मजल्यावरून तुम्हाला गाठण्याचा प्रयत्न  करीत आहेत. अशा प्रसंगी तुम्ही उडी मारली तर ती आत्महत्या की सुटकेचा शेवटचा प्रयत्न ?

आजचे प्रश्न आत्महत्या या विषयावर आहेत.

जीवनाचा वाढता वेग झेपत नाही. एकटेपणा सोसत नाही. मनाचे आक्रंदन ऐकायला सोबत कुणीही नाही. आयुष्याचा दोर हातातून निसटत जातो आहे आणि कडेलोटाच्या क्षणी झेलायला समर्थ असा परीकथेतला राजकुमार ऐनवेळी भरकटून निघून गेला आहे .ही चित्रपटाची कथा नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्ये आत्महत्या करणार्‍या अभिनेत्रींची कहाणी आहे. जिया खान -विवेका बावाजी-कुलजीत रंधावा -नफीसा जोसेफ अशा ज्ञात आणि अनेक अज्ञात स्त्रियांची कहाणी आहे. हॉलीवुडची सम्राज्ञी मेरेलीन मन्रोनी हाच मार्ग स्विकारला डर्टी पिक्चरच्या नायीकेने पण हाच मार्ग आपलासा केला.

डर्टी पिक्चरची कहाणी ज्या अभिनेत्रीच्या जीवनावर बेतली आहे त्या दाक्षीणात्य सिल्क स्मिता या अभिनेत्रीचे नाव काय ?
 

सुसाईड नोट हा आयुष्याच्या शेवटच्या क्षणी व्यक्त होण्यासाठी व्यथीत जीवाने  केलेला अखेरचा प्रयत्न असतो. स्वतःची हत्या स्वतःच करताना सुसाईड नोट लिहण्याचा हेतू काय असावा यावर अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे.आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होउ नये म्हणून -नावडत्या व्यक्तीला जन्मभर त्रास व्हावा म्हणून -जन्मभर अव्यक्त राहीलेले विचार व्यक्त करण्यासाठी - त्यांच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्याची कबूली देण्यासाठी म्हणून अशा अनेक कारणासाठी सुसाईड नोट वापरली जाते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण अमर करण्याचे श्रेय ज्या कंपनीला जाते त्या कंपनीच्या म्हणजे कोडॅकच्या संस्थापकांनी दुखण्याला कंटाळून आत्महत्या केली .त्यांची सुसाईड नोट होती ती अशी "To my friends: my work is done. Why wait?"
या व्यक्तीचे नाव काय ?
 

वासू आणि सपनाची प्रेमकहाणी म्हणजे एक दुजे के लिये. राज आणि रश्मीची कथा म्हणजे कयामत से कयामत तक .अशा अनेक दुखांतीकांनी हिंदी सिनेमा सृष्टी गाजवली आहे. आत्महत्येत अंत होणार्‍या या  कहाण्या म्हणजे नविन शोध नव्हता. हीर रांझा-सोनी महीवाल- मिर्झा साहीबा- सास्सुइ पून्हून या जुन्या कथांचेच हे रीमेक होते. हीर रांझा आणि इतर कथा पद्य रुपाने अनेक शतके गायल्या जातात. वारीस शहा या सूफी कविने लिहीलेली हीर ही पंजाबीतील अमर कलाकृतींपैकी मानली जाते.जाती धर्म परंपरा समाज या सगळ्यांची बंधने झुगारून देणारी ही प्रेमी युगुले इतिहासात अमर झाली आहेत. हा प्रेमाचा इतिहास भिन्नलिंगी संबंधांचा आहे पण ज्या लैंगीक संबंधांना म्हणजे समलींगी संबंधांना सामाजीक मान्यता नाही त्या प्रेमाची आणि युगुलांची समस्या फार विपरीत आहे. संगणक शास्त्राचा पाया घालणार्‍या ब्रिटीश शास्त्रज्ञाचे २०१३/१४ हे जन्मशताब्दी वर्ष आहे.अत्यंत कुशाग्र बुध्दीमत्तेचा ह्या युवकावर १९५२ साली ब्रिटीश सरकारने असभ्यतेचा खटला भरला.तुरुंगवासाच्या शिक्षेला टाळण्यासाठी त्याने केमीकल कॅस्ट्रॅशनचा मार्ग स्विकारला. या छळणूकीला कंटाळून त्याने वयाच्या ४२ व्या वर्षी सायनाईड खाउन आत्महत्या केली. त्यावेळी ब्रिटनमध्ये समलैंगीकता हा कायद्याने गुन्हा होता. २००९ साली ज्या पध्दतीने सरकारने या शास्त्रज्ञाचा कोंडमारा केला त्याबद्दल पंतप्रधान गॉर्डन ब्राउन यांनी सरकारतर्फे सार्वजनीक माफी मागीतली. स्तंभलेखनाच्या लेखनमर्यादेत आणखी माहीती देणे शक्य नाही. संगणकशास्त्राचा पाया घालणार्‍या या शास्त्रज्ञाचे नाव काय ?...

राजकारणामुळे आत्महत्येला प्रवृत्त झालेल्याचे एक उदाहरण बघा .२००३ साली इराकचे युध्द सुरु झाले. २००६ साली सद्द्दम हुसेनला फासावर लटकण्यात आले.१५डिसेंबर २०११ मध्ये इराकचे युध्द संपले. जैवीक विध्वसाची साधने असल्याची खात्री पटल्यावरच या युध्दाची सुरुवात झाली असा दावा अनेक वेळा अमेरीकन आणि ब्रिटीश सरकारने केला. पण अँड्र्यु गिलीगन नावाच्या एका बीबीसीच्या एका पत्रकाराने हा दावा फोल असल्याचे उघडकीस आणले. हे युध्द सुरु करण्यापूर्वी जे गोपनीय अहवाल सादर केले गेले त्यात इराकची  पाउण तासाच्या अवधीत जैवीक आणि रासायनीक शस्त्र वापरण्याची सज्जता हा एक घुसडलेला खोटा अहवाल असल्याचे गिलीगनने सांगीतले. या बातमीनंतर जी राजकीय रणधुमाळी माजली त्यातून बीबीसीला त्यांच्या बातमीचा मूळ स्त्रोत कोणता हे जाहीर करण्यास भाग पाडण्यात आले. "पाऊण तासात सज्जता " संशयास्पद असलल्याचा संदर्भ ज्या शास्त्रद्याने दिला त्या शास्त्रज्ञाला कमीटीसमोर साक्ष देण्यास बोलावले गेले. या दरम्यान झालेल्या धारदार उलटतपासणीनंतर दोनच दिवसात या शास्त्रज्ञानी वेदनाशामक गोळ्यांचा मोठा दोस घेउन हाताच्या शिरा कापून जीवनाचा अंत करून घेतला. ह्या घटनेपूर्वी काही दिवसापर्यंत  त्यानी वारंवार एकाच गोष्टीचा उल्लेख केला तो म्हणजे "माझी खात्री आहे की मी त्याचा  (गिलीगनचा) बातमीचा प्रथम दुवा नाही ". पण मानसिक ताण सहन न झाल्यामुळे जीवनाची अखेर आत्महत्येत झाली .

त्या शास्त्रज्ञाचे नाव काय ?
 

सजीवांचे जीवन ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. येथे मरणातून पुन्हा जीवन सुरु होते. नेक्रॉसीस म्हणजे आजाराने होणारा पेशींचा मृत्यु.त्यामुळे शरीराचे संबंधीत अवयव निकामी होतात. या उलट पेशींच्या आत्महत्येतून नवीन काही जन्माला येते. उदाहरणार्थ पेशी आत्महत्या करतात म्हणून आपली हातापायाची बोटे वेगवेगळी होतात-मेंदूतील संवेदना केंद्रे वेगवेगळे अस्तित्व टकवून धरू शकतात.याला प्रोग्राम्ड सेल डेथ असेही म्हणतात.  सजीवांच्या पेशींची हेतूपूर्वक आत्महत्या ही जगण्याची अत्यावश्यक क्रिया आहे.मरणात खरोखर जग जगते ते असेच काय  ?

शास्त्रीय परीभाषेत या पेशींच्या आत्महत्येला काय म्हणतात. ?

 

म्रुत्यु म्हणजे जीवनातून तत्काळ सुटका.जगण्याच्या वेदनेला टाळण्यासाठी मृत्युला कवटाळणारे जीव वेदनारहीत मार्गाच्या शोधात असतात. गुप्तहेरांच्या अनेक कथांमध्ये मृत्युचा एक्सप्रेस हायवे गाठणे ही जबाबदारी पण असते.अनेक गुप्तहेर कथांमध्ये उल्लेख असलेले आणि बर्‍याच वेळा प्रत्यक्षात वापरले जाणारे एक रसायन म्हणजे पोटॅशीयम सायनाईड.या रसायनाची कुपी किंवा केप्सुल हा गुप्तहरासाठी शेवटचा मार्ग असतो. या गोळीला एल पील -किल पील- लिथाल पील- डेथ पील अशाही नावांवी ओळखले जाते.अखेरच्या क्षणी दाढेखाली फोडल्यावर  काही क्षणात मृत्यु.अपवाद फक्त रासपुटीन.रासपुटीन्ने सायनाईद पण पचवले. .(रासपुटीन म्हणजे ला..ला,, रासपुटीन । लव्हर ऑफ द रश्यन क्वीन या गाण्यातला) सायनाईडच्या गोळीला दुसरा पर्याय म्हणजे सॅक्सीटोक्झीन (न्युरोटॉक्झीन).दुसर्‍या महायुध्दा दरम्यान अनेक ब्रिटीश गुप्तहेरांनी शेवटच्या क्षणी आत्महत्या केली ती पोटॅशीयम सायनाइडची कॅप्सुल दाताखाली चिरडूनच.गोरींग हिमलर या नाझी नेत्यांनीहीआश्रय घेतला तो पोटॅशीयम सायनाईडचा. राजीव गांधींच्या मारेकर्‍यांनी पण याच रसायनाचा उपयोग आत्महत्या करण्यासाठी केला होता.

एक सोपा प्रश्न पोटॅशीयम सायनाईडचा रासायनीक फॉर्म्युला काय आहे?

 

मेंदूच्या विविध केंद्रातून दिली जाणारी प्रेरणा ही एक रासायनीक प्रक्रिया असते.प्रत्येक संवेदनेचे वेगळे रसायन असते.आत्महत्येला प्रेरीत करणारे रसायन नेमके कोणते याची मिमांसा अजून झालेली नाही.असे असले तरी काही औषधांच्या सेवनाने अतीव नैराश्य येउन आत्महत्येचे विचार मनात येतात हे सिध्द झालेले सत्य आहे. धुम्रपानाची सवय सुटावी म्हणून फायझर कंपनीने एक औषध बाजारात आणले. या औषधाने धुम्रपानापासून मुक्ती मिळते पण आत्महत्येचे विचारही मनात बळावतात (आणि त्यामुळेही धुम्रपानाची सवय सुटते )  Patient may develop with elevated mood or changes in behavior and Suicidality; आणखी संदर्भ  http://www.medindia.net/doctors/drug_information/varenicline.htm
या औषधाचे जेनेरीक नाव व्हॅरेनेक्लीन आहे. प्रश्न असा आहे की औषधाचे ब्रँड नेम -बाजारात ओळ्खले जाणारे -नाव काय ?

 

अत्यंत टोकाच्या धार्मीक  -राजकीय विचाराच्या आग्रहासाठी अतीरेकी कारवाया करणार्‍या अनेक संघटना आहेत .परंतू केवळ धार्मीक विचाराने प्रेरीत होऊन अनेक व्यक्तींनी एकाच वेळी आत्महत्या करण्यास भाग पाडणारे धार्मीक पंथही एकविसाव्या शतकात आहेत. १९७८ साली अमेरीकेत जोन्सटाउन येथे एकाच वेळी ९२० लोकांनी सामूहीक आत्महत्या केली. मृतांमध्ये लिओ रायन या सिनेट सदस्याचा पण अंतर्भाव होता.हा एकच धार्मीक पंथ आहे असे नाही हेवन्स गेट हा पण एक पंथ आहे ज्याच्या सदस्यांनी सामूहीक आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. प्रश्न असा आहे की जोन्स टाउन येथे एकाच वेळी ९२० व्यक्तींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पंथाचे नाव काय ?

 

नैराश्यापोटी मृत्यु स्विकारण्यापेक्षा नैसर्गिक मृत्युला सामोर्‍या जाणार्‍या पांगळ्या कवि गोविंदांची कवितेचे काही अंश
सुंदर मी होणार । सुंदर मी होणार
सुंदर मी होणार  । हो ! मरणाने जगणार
नव्या तनुचे नव्या शक्तीचे पंख मला फूटणार
आनंदी आनंद जाहला । मरता मी हसणार
हासत मरणे गोविंदाचा। प्रेमपंथ ठरणार

सबस्क्राईब करा

* indicates required