या 'आयडिया'नी मुलं होत असतील तर नवरा हवाय कशाला ?
महाराज सारखे चित्रपट बघून अंधश्रध्दा या विषयावर फक्त आपलीच मोनोपली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते काय खरं नाही. अंधश्रध्दा हा universal phenomenon' आहे. आता व्हिक्टर नॉयर नावच्या एका पत्रकाराची गोष्ट ऐकाच !
१९ व्या शतकातला हा पत्रकार सरकारच्या गैरव्यवहारावर बोचरी टीका करणारा पत्रकार म्हणून फेमस होता
या व्हिक्टर नॉयरचं नेपोलियनच्या भावाशी पिएर बोनापार्टे बरोबर भांडण झालं आणि पिएर बोनापार्टेने त्याला गोळ्या घातल्या.
त्यानंतर खळबळ उडाली - लोकं रागावले - त्यांनी निषेध केला वगैरे नेहेमी होतं तसं सगळं झालं.
व्हिक्टरच्या कबरीवर त्याच्या पाठीराख्यांनी त्याचं ब्रॉझचं शिल्प उभारलं.
आता पुढची गंमत ऐका !
काही दिवसातच एक विचित्र भुमका उठली ती अशी की स्त्रियांनी व्हिक्टरच्या गुप्तांगावर आपले गुप्तांग घासले तर ताबडतोब गर्भधारणा होते. आता ही अफवा कशी निर्माण झाली याबद्दल काहीच माहिती मिळत नाही पण आजही लाखो महिला पॅरीसमधल्या भेट देतात. त्याच्या पुतळ्याची पप्पी घेतात पायाला हात लावतात आणि आपले गुप्तांग त्याच्या गुप्तांगावर घासतात.हे केवळ मज्जा म्हणून नाही तर श्रध्दापूर्वक केले जाते.
मध्यंतरी हा आचरट प्रकार बंद व्हावा म्हणून कबरीच्या भोवती सरकारने कुंपण घातलं पण पॅरीसच्या बायकांनी निषेध मोर्चे काढून कुंपण हटवायला लावलं.
सांगायची गोष्ट अशी की म्हटलं गंमतीदार -विचित्र आणि म्हटलं तर हास्यास्पद अशी अंधश्रद्धेची गोष्ट आहे. अंधश्रद्धा सर्वत्र पसरलेला काळोख आहे.तो कालही होता आजही आहे हे सांगणारा हा किस्सा आहे !!