हजारो वर्षे गोठून गेलेला हा जीव पुन्हा जिवंत कसा झाला?

शास्त्रीय भाषेत नेमॅटोड प्रजातीचा हा जंताला Panagrolaimus kolymaensis म्हणतात. हा जंत शास्त्रज्ञांना सैबेरियाच्या बर्फाळ वातावरणात एका नदीच्या पात्रात मिळाला.हा जंत ४६००० वर्षांपूर्वी बर्फात पूर्णपणे गोठला होता.प्रयोगशाळेत सर्वसाधारण तापमानात आल्यावर लक्षात आले की हा जंत चक्क जिवंत आहे.त्याला पुरेसे खाद्य दिल्यावर त्याच्यापासून नवीन पिलावळ जन्माला आली आणि त्याचे आयुष्य संपले.थोडक्यात ४६००० वर्षांपूर्वी त्याचा जीवनक्रम गोठला होता तो पूर्ण करून तो गेला. हे नेमके कसे होते हे अजून समजलेले नाही.शास्त्रज्ञांना आशा आहे की लवकरच असे आणखी काही जीव त्यांना अभ्यासाला मिळतील.एका शास्त्रज्ञाच्या तर्काने पृथ्वी सोडून इतर ग्रहांवरही असे जीव मिळण्याची शक्यता आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required