तुमच्या उत्पादनाची टॅग-लाईन बनवताय ? आधी ही रेडबुलची केस वाचा !

'रेड बुल' या पेयाचा आणि तुमचा आतापर्यंत परिचय नक्कीच झाला असेल.त्यांची फेमस टॅगलाईन किंवा स्लोगन होती "Red Bull Gives You Wings" म्हणजे हे -रेड बुल-प्याल तर तुम्हाला पंख फुटतील.आता या वाक्यात लपलेला अर्थ असा आहे की रेड बुल तुमच्या पंखांना बळ देते.आपल्या मर्यादांना ओलांडून आयुष्यात पुढे  झेप घ्या असे रेडबुलवाल्यांना सांगायचे होते.आता एक गमतीची गोष्ट पण वाचा. रेड बुल बाजारात आणण्यापूर्वी एक सर्व्हे करण्यात आला.यासाठी अनेक लोकांना रेड बुलची चव घेऊन त्यांचा अभिप्राय देण्याची विनंती करण्यात आली होती. बहुतांश लोकांनी 'हे मुत्रट चवीचे पेय कोण पिणार' असाच अभिप्राय दिला होता. तरीपण बाजारात आल्यावर स्लोगनच्या जोरावर आणि अर्थात त्यात्ल्या कॅफीनमुळे हे पेय कोकाकोलापेक्षाही जास्त खपायला लागलं.२०१३ साली बेंजामीन कॅराथेर्स नावाचा एक इसम रेड बुल विरोधात कोर्टात गेला. त्याचे म्हणणे असे होते "Red Bull Gives You Wings" हे स्लोगन म्हणजे खोटारडेपणा आहे.तो दहा वर्षे रेड बुल पितो आहे पण त्याला अजूनही पंख फुटलेले नाहीत.त्याचे ऐकून आणखी काही मंडळी कोर्टात गेली. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने ग्राहकांचे म्हणणे बरोबरच असल्याचा निर्वाळा दिला. शेवटी रेड बुल कंपनीला एक कोटी ३० लाख डॉलर्सची मांडवली करावी लागली. आता तुम्ही रेडबुलची टॅगलाईन वाचा ती अशी आहे "Red Bull gives you wiiings".

सबस्क्राईब करा

* indicates required