१९८२ सालच्या एका भोजपुरी चित्रपटाची कॉपी म्हणजे 'हम आप के है कौन' !

नदिया के पार - १९८२ सालाचा हा भोजपुरी म्हणा किंवा अवधी ,या हिंदीच्या बोलीभाषेतला चित्रपट !

या चित्रपटाची निर्मितीचा संकल्प तर राजश्री प्रॉडक्शनने सोडला होता पण एक मोठी अडचण अशी होती की राजश्री प्रॉडक्शन कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती.कौटुंबिक विषयांवर आधारीत त्यांचे चित्रपट चालत नव्हते.नव्याने आलेले अभिनेते-अभिनेत्री यांची मागणी फार मोठी होती.त्यावेळी सूरज बडजात्या यांनी एक असा निर्णय घेतला की आपण 'लो बजेट ' चित्रपट बनवू या. बडजात्यांनी तर साधना सिंग नावाच्या मुलीची ऑडिशन करून तिला मुंबईत बोलावून घेतले होते.सचिन पिळगावकर यांना नायक म्हणून घ्यायचे ठरले.तरीपण आर्थिक तंगीमुळे हा चित्रपट होणार नाही हे जवळजवळ निश्चितच झाले होते.एकूण डळमळीत परिस्थिती बघून साधना सिंगने निर्मात्यांना स्पष्टच विचारले की चित्रपट होणार आहे की नाहि ते सांगा,नाहीतर मी परत उत्तर प्रदेशला निघून जाते. साधना सिंगचे हे बोलणे बडजात्यांच्या मनाला इतके भिडले की काही होवो हा चित्रपट करायचाच. आणि चित्रपट पूर्ण झालाच , नुस्ता झाला नाही तर बॉक्स ऑफीसवर सुपरहिट झाला.कौन दिसा में लेके चला रे बटोहिया हे गाणे सर्व उत्तर भारतीय राज्यात गाजले.आर्थिक संकट टळले. राजश्रीची बुडती नाव पुन्हा तरंगायला लागली पण पुढे काय ??? या प्रश्नाचे उत्तर पण 'नदिया के पार' ने दिले.अवधी -भोजपुरी भाषेतला हा चित्रपट 'हम आप के है कौन'च्या रुपाने परत आला आणि सुपर ड्युपर हिट झाला."दीदी तेरा देवर दीवाना" आणि बाकीची सगळी तेरा गाणी घरोघरी पोहचली

बोलीभाषेतला एक छोटासा 'लो बजेट' चित्रपट किती मोठे यश मिळवून देतो याचे उदाहरण म्हणजे 'नदिया के पार' !!!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required