स्वित्झर्लंड जगातला सर्वोत्तम लोकशाही सरकाराचा नमुना का समजला जातो ?

स्वित्झर्लंडच्या लोकशाहीचे हे कौतुक कदाचित एक नवा वाद मनात उभा करू शकेल पण तो धोका स्विकारून बोभाटाचा हा लेख नक्की वाचा !
'छोटा पॅक बडा धमाका'

'छोटा पॅक बडा धमाका'
सरकारी यंत्रणा गाव पातळीवरून - राज्यपातळीवर आणि नंतर केंद्राच्या पातळीवर काम करत असतात.या यंत्रणा जसजशा पुढे जातात त्या आकाराने मोठ्या आणि खर्चिक होत जातात.स्वित्झर्लंड आकाराने लहान देश असल्याने यंत्रणांवरचा खर्च मर्यादित ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे.दुसरे असे की पातळी वाढली तरी यंत्रणेचा आकार तसाच म्हणजे छोटाच राहतो. साहजिकच या पातळीवर फार मोठा खर्च सर्वसामान्यांना सहन करावा लागत नाही.
सत्त्ता 'बाबू' लोकांच्या हातात नाही.

सत्त्ता 'बाबू' लोकांच्या हातात नाही.
देशाच्या कारभारात नोकरशाहीला अवास्तव महत्व दिले जात नाही नोकरशाहपेक्षा मतदात्याला जास्त अधिकार आहेत.इतर सर्व लोकशाही देशात अधिकार आहेत पण निवडणूकी नंतर मतदाराला दुय्यम दर्जा दिला जातो.मोठमोठे सार्वजनिक खर्च्च काय अगदी न्यायाधिशांच्या नेमणूकीपर्यंत सर्व पातळीवर नागरिक त्यांचा अधिकार दाखवतात आणि त्यांना ती संधी दिली जाते.सरकारला प्रत्येक पातळीवर विचारलेल्या प्रश्नांची जबाबदार उत्तरे द्यावीच लागतात.
सरकारी सत्ता वि-केंद्रीत किंवा अ-केंद्रीत आहे.

सरकारी सत्ता वि-केंद्रीत किंवा अ-केंद्रीत आहे.
स्वित्झर्लंड हा देश २६ कँटॉनचा म्हणजे आपल्या भाषेत २६ राज्यांचा समूह आहे.केंद्रातील सरकारला करातला छोटा भाग दिला जातो.कर आकारणीचे बहुतांश अधिकार राज्यांना आणि म्युनिसिपालिटीला दिलेले आहेत.त्यामुळे आपल्या राज्यात- शहरात जास्तीतजास्त उलाढाल व्हावी म्हणून हे घटक सक्रिय असतात.
राज्यांची निर्णयक्षमता अधिक

राज्यांची निर्णयक्षमता अधिक आहे.
छोट्यामोठ्या समस्यांचे आकलन राज्य- शहर पातळीवर अधिक असते. केंद्र या समस्या सहज समजू शकत नाही. या कारणाने निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार स्थानिक पातळीला दिलेले आहेत.म्युनिसिपालिटीने- राज्याकडे , राज्याने केंद्राकडे दाद मागत बसण्यात वेळ वाया घालवला जात नाही.
राजकारण हे 'करियर' नाही.

राजकारण हे 'करियर' नाही.
राजकारणात कोणीही कायम राजकारणी नसतात.ते काही काळ राजकारणी असतात आणि कालांतराने आपापल्या कामधंद्यात व्यस्त असतात.थोडक्यात राजकारण हे कोणाचेही कायमचे 'करियर' नसते.त्यामुळे आवडतील तीच कामे करणे - राष्ट्रीय कामांवर वैयक्तिक प्रभाव ठेवणे- अधिकारांसाठी मारामारी करणे किंवा घडवीन आणणे असे काही होत नाही.आजचा राजकारणी उद्याचा धंदेवाईक किंवा व्यावसायिक असतो.प्रदिर्घ काळासाठी सत्तेत राहणारे 'मेरे मनकी मर्जी' या पध्दतीने वागू शकण्याची शक्यता जास्त असते म्हणून एकहाती प्रदिर्घ सत्ता टाळली जाते.
आम्ही कोणाच्याही बाजूचे नाही

आम्ही कोणाच्याही बाजूचे नाही. स्वित्झर्लंड हा देश गेली अनेक वर्षे - पहिले महायुध्द- दुसरे महायुध्द - अशा सर्व काळात तटस्थ म्हणजे तंट्यांपासून -लढाईपासून दूरच आहे. ते कोणाचीही बाजू घेत नाही. साहजिकच जगात संपत्ती सर्वार सुरक्षित राहते ती या देशातच !
या देशात व्यावहारिक दृष्टीकोन सर्वात महत्वाचा समजला जातो त्यामुळे वांशिक - धार्मिक -भाषिक प्रभावापासून हा देश दूर आहे.व्यापार आणि अर्थकारण या दोन्ही घटकांना प्राधान्य दिले जाते.
आपण या देशाच्या धोरणांची तुलना आपल्यासारख्या मोठ्या देशाशी करू शकत नाही. या देशाचा आकार लहान असल्याने बर्याच गोष्टी हाताळणे त्यांना सोपे जाते पण नोकरशाही- लाचलुचपत- एकहाती प्रदीर्घ सत्ता- स्थानिक धोरणांना प्राधान्य अशा अनेक गोष्टींचा विचार आपण नक्कीच करू शकतो.