मतदार यादीत तुमचं नाव आहे का? इथे क्लिक करा आणि जाणून घ्या !!!

निवडणूक एका दिवसावर आलेली असताना मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु आहे. मतदार यादीत नाव असूनसुद्धा अनेकांना मतदान करता येत नाही. यावर निवडणूक आयोगाने एक सोपा मार्ग काढला आहे. आता तुमचे मतदार यादीत नाव आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे.

http://103.23.150.139/marathi/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पुढील प्रक्रियेद्वारे आपलं नाव पाहू शकता.

 

1. साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ‘Name Wise’ आणि ‘ID Card Wise’ हे दोन पर्याय उपलब्ध असतील.

2. त्यातील ‘Name Wise’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे ‘District’ आणि ‘Assembly’ असे दोन पर्याय समोर येतील.

3. त्यापैकी ‘Assembly’ हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.

4. त्यामध्ये पहिला पर्याय ‘Select District’ आहे. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.

5. त्या पुढचा पर्याय ‘Select Assembly’. म्हणजेच तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.

6. त्यानंतर तुमचे नाव टाका.

7. त्यानंतर तुमचे आडनाव टाका.

8. त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.

9. हे सर्व रखाने भरल्यानंतर ‘Search’ या पर्यायवर क्लिक करा.

 

यातील माहिती भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ही सगळी माहिती तुम्हाला इंग्रजीत भरावयाची आहे. एकदा सगळी माहिती भरली की तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर दिसेल.

मग वाट कसली बघताय. तुमचं नाव चेक करा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा!

सबस्क्राईब करा

* indicates required