computer

किस्से नोबेलचे : नवरा, बायको आणि मुलीला देखील नोबेल मिळाल्याची गोष्ट!!!

असं म्हणतात कुटुंबात एक व्यक्ती शिकली तरी इतर कुटुंबियांची देखील प्रगती होते. पण काही कुटुंबांत सगळेच लोक इतके हुशार निघतात की ते देशाच्या आणि जगाच्याही प्रगतीला कारणीभूत ठरतात!!

आज आम्ही नोबेल पुरस्काराचा असा किस्सा सांगणार आहोत की ज्यात पूर्ण कुटुंब नोबेल पुरस्कारांनी सन्मानित झाले.

आजपर्यंत अनेक महिलांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. पण दोनवेळा नोबेलवर नाव कोरले जाणारी महिला एकच आहे. मारी क्युरी असे त्या असाधारण महिलेचे नाव!! मारी आणि त्यांचे पती पिअर क्युरी दोन्ही विज्ञानावर प्रेम करणारे. याच प्रेमामुळे लग्नानंतर देखील रात्रंदिवस प्रयोगशाळेत बसून कुठला ना कुठला प्रयोग करत बसणे हा त्यांचा नेहमीचा उद्योग.

क्युरी दांपत्याच्या मेहनतीला फळ आले, त्यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटी( किरणोत्सर्जन) सारखा जगाला नवी दिशा देणारा शोध लावला. त्यासाठी १९०३ साली पती-पत्नीला विभागून नोबेल पुरस्कार देण्यात आला.

नोबेल मिळाला म्हणजे आयुष्य सार्थकी लागले असे समजण्याची प्रथा आहे. पण मारी क्युरी यांचे आयुष्य एवढे साध्या वळणाने जाणारे नव्हते. नोबेल मिळाल्यावर त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. १९०६ साली मेरी यांचे पती पिअर यांचे निधन झाले. आयुष्यभराचा सोबती असा अर्ध्यावर सोडून गेला होता.

मेरी यांना मुलीला मोठे करायचे होते आणि स्वतःचे शोधकार्य देखील पूर्ण करायचे होते. अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी संशोधन सुरू ठेवले. १९११ साली त्यांनी आज जगभर दिसत असलेले रेडियम शुद्धीकरणाची पद्धत त्यांनी शोधून काढली. याच शोधासाठी त्यांना दुसऱ्यांदा नोबेल देण्यात आला. महिलेने दोनदा नोबेल मिळवण्याचा त्यांचा हा रेकॉर्ड १०० वर्षांनंतर देखील अबाधित आहे. तसाही आजवर दोनवेळा नोबेल मिळण्याचा मान फक्त दोनच व्यक्तींना मिळाला आहे.

आयरिन ही मारी आणि पिअर क्युरी यांची मुलगी. ती मोठी होत होती. तिच्या मनात देखील संशोधन करण्याची भूक निर्माण करण्यात मारी यशस्वी झाल्या होत्या. दुर्दैवाची साथ मात्र त्यांचा पिच्छा सोडत नव्हती. ज्या रेडियमचा त्यांनी शोध लावला, त्याच रेडियमच्या रेडिएशन मुळे १९३४ साली त्यांचा मृत्यू झाला. मारी यांच्या मृत्यूच्या एका वर्षांनंतर त्यांची मुलगी आयरिन हिला देखील रसायनशास्त्रातील नोबेल देऊन सन्मानित करण्यात आले.

अशाप्रकारे मारी आणि पिअर हे क्युरी दाम्पत्य दुर्दैवी मृत्यूचे शिकार ठरले. पण पूर्ण कुटुंबाने नोबेल मिळवून जगाच्या इतिहासात स्वतःचे नाव मात्र सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवले.

सबस्क्राईब करा

* indicates required