computer

आपण A4 साईझ कागद का वापरतो? हे आकार काय आहेत आणि कुणी ठरवले? इतर आकार काय आहेत? सर्व काही जाणून घ्या..

तुम्ही ऑफिस कामासाठी कुठल्या आकाराचा कागद वापरता? A4 size, बरोबर ना? मुख्यतः कुठल्याही व्यवहारिक बाबींसाठी A4 आकाराचा कागद सगळीकडे वापरला जातो. अगदी भारतातच नाही तर जगभरात A4 अधिकृत छपाईसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण हा आकार आला कुठून? A4 व्यतिरिक्त इतर अनेक आकाराचे कागद वापरले जातात हे अनेकांना माहीत नाही. आज आपण याविषयी सविस्तर माहिती करून घेऊयात.

तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण जग दररोजच्या छपाईमध्ये A4 पेपरचा सर्वाधिक वापर करते. A4 पेपर शीट हा A आकाराच्या कागदाच्या मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेत प्रत्येक कागदाचा आकार आणि परिमाण यामध्ये एक गणित असते.. या मालिकेतील प्रत्येक पेपरचा आकार आणि त्यामागे तर्क आहे.

A4 पेपरचा थोडक्यात इतिहास पाहिल्यास, जगभरात आकाराच्या कागदाचा अधिकृत वापर विसाव्या शतकात सुरू झाला आणि हळूहळू हा आकार मानक म्हणून संपूर्ण जगात वापरला जाऊ लागला. आयएसओ २१६ नावाचे आंतरराष्ट्रीय पेपर मानक जगात पाळले जाते. हे पेपर मानक जर्मनीच्या DIN ४७६ मानकावर आधारित आहे. A, B आणि C मालिका पेपर शीट्स हे जगभरातील ISO २१६ मानकांवर बनवलेले आहेत. हे कागद विविध छपाई कामांसाठी वापरले जातात. त्यापैकी A मालिका सर्वात लोकप्रिय आहे.

या मालिकेत A० ते A८ पर्यंतचे कागदाचे आकार बनवले जातात. बर्‍याच देशांमध्ये, A४ , A३ आणि A२ आकारांची कागदपत्रे सर्वात जास्त वापरली जातात. A१ आणि A0 आकाराचा कागद क्वचितच वापरला जातो. A मालिकेतील प्रत्येक पेपर प्रमाणानुसार सारखाच असतो, पण तो कसा होतो? चला समजून घेऊया.

A मालिकेतील सर्वात मोठ्या आकाराचा कागद म्हणजे A0 शीट. त्याचा आकार ४६.८ इंच लांबी आणि 33.१ रुंदीचा आहे. मिलिमीटरमध्ये त्याचा आकार ८४१ मिमी रुंदी आणि ११८९ मिमी आहे आणि या कागदाचे क्षेत्रफळ १ चौरस मीटर आहे. आता जर तुम्ही ११८९ ला ८४१ ने भागले तर तुम्हाला त्याचे उत्तर १.४१४ हे मिळेल. ही पाहा यादी A मालिकेतल्या कागदाच्या आकारांची..
 

A4आकाराच्या पेपर मालिकेत पेपरची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर समान ठेवण्यासाठी बरेच अवघड गणित करावे लागते. परंतु त्यामुळे आपले काम खूप सोपे होते. पेपर्सचे गुणोत्तर समान नसेल तर कोणत्याही मोठ्या आकाराच्या कागदावर छापलेली किंवा लिहिलेली बाब अर्ध्या आकाराच्या कागदावर आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याच प्रमाणामुळे, फोटो एडिट करताना किंवा कॉपी करताना आकारानुसार तो सहज वाढवू किंवा कमी करू शकतो.

आता तुमच्या लक्षात आले का पेपरचा आकार कसा ठरवला जातो? माहिती आवडल्यास जरुर शेयर करा

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required