computer

नोबेल आणि ऑस्कर असे दोन्ही पुरस्कार मिळवणाऱ्या कोण आहेत या दोन व्यक्ती ?

दिग्दर्शन, लेखन, अभिनय, गायन, इत्यादी चित्रपटाशी निगडीत क्षेत्रांसाठी ऑस्कर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार मानला जातो. तसच साहित्य, अर्थशास्त्र, विज्ञान, शांतता अश्या महत्वाच्या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार हा महत्वाचा मानला जातो. हे दोन्ही पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळालेलं कधी ऐकलं आहे का ? हे अर्थात कठीण आहे, पण जगात अश्या दोन व्यक्ती आहेत ज्यांना आज पर्यंत हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत.

आज जाणून घेऊया त्या दोन व्यक्ती आहेत तरी कोणत्या !!

 

१. जॉर्ज बर्नार्ड शॉ

"जॉर्ज बर्नार्ड शॉ" हे एक महान आयरिश लेखक होते. साहित्यात त्यांनी मोठं काम केलं असलं तरी त्यांची मुख्य आवड ही नाट्य लेखन होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल ६० नाटकं लिहिली. नाटकांबरोबर त्यांनी निबंध, कादंबऱ्या आणि लघुकथा देखील लिहिल्या. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना १९२५ साली नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. नोबेल मिळाल्यानंतर १३ वर्षांनी त्यांनी ‘पिग्मेलीयन’ या सिनेमासाठी पटकथा लिहिली ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला. त्यावेळी त्यांचं वय ८२ वर्ष होतं

२. बॉब डिलन

गायक, गीतकार, संगीतकार "बॉबी डिलन" हे एका संपूर्ण पिढीचा आवाज म्हणून ओळखले जातात. त्यांची गाणी ही अमरिकेतील नागरी हक्क आंदोलन तसेच व्हियेतनाम युद्धविरोधी आंदोलनांत मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. २००० साली त्यांच्या ‘वंडर बॉयज’ चित्रपटातील ‘थिंग्स हॅव चेंज्ड’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर देण्यात आला. या गाण्याने ऑस्कर बरोबर आणखीही काही पुरस्कार मिळवले.

एक गीतकार म्हणून बॉबी डिलन यांना नोबेल मिळणार अशी चर्चा अनेक वर्ष होत होती. तो दिवस शेवटी २०१६ साली आला. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि ते जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पंगतीत जाऊन बसले.

 

अश्या प्रकाराने आपल्या प्रतिभेच्या जोरावर या दोन दिग्गजांनी जगातील दोन अत्यंत महत्वाच्या पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली.

सबस्क्राईब करा

* indicates required