मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

टीव्हीवर देशाच्या अध्यक्षाचा रोल साकारणारा कॉमेडीयन खरोखर झाला अध्यक्ष ? कुठे घडलंय हे ??

2 मिनिट वाचन
शेअर करा:
टीव्हीवर देशाच्या अध्यक्षाचा रोल साकारणारा कॉमेडीयन खरोखर झाला अध्यक्ष ? कुठे घडलंय हे ??

तुम्ही एखाद्या नाटकात राजाचं पात्र सकारात आहात आणि अचानक खऱ्या आयुष्यात लोकांनी तुम्हाला राजा केलं तर ? ही दंतकथा वाटू शकते पण हे खऱ्या आयुष्यात पण घडलं आहे.

टीव्हीवर देशाच्या अध्यक्षाचा रोल साकारणारा कॉमेडीयन खरोखर झाला अध्यक्ष ? कुठे घडलंय हे ?? – चित्र 1

Volodymyr Zelensky हे कॉमेडीयन आहेत. त्यांचा Servant of the People नावाचा एक गाजलेला टीव्ही शो येतो. त्यात त्यांचं पात्र अपघाताने देशाचा अध्यक्ष बनतं. या टीव्ही शो प्रमाणेच त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडलं आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते बहुमताने युक्रेनचे अध्यक्ष बनणार आहेत. त्यांना तब्बल ७३% मतं मिळाली आहेत.

टीव्हीवर देशाच्या अध्यक्षाचा रोल साकारणारा कॉमेडीयन खरोखर झाला अध्यक्ष ? कुठे घडलंय हे ?? – चित्र 2

त्यांना लगेचच युक्रेन चे अध्यक्ष म्हणता येणार नाही कारण ३० एप्रिल रोजी अधिकृतरीत्या निकाल जाहीर झाल्यावर हे ठरेल. या मधल्या काळात इस्टरची सुट्टी असल्याकारणाने निकालाची थोडी वाट बघावी लागणार आहे.

टीव्हीवर देशाच्या अध्यक्षाचा रोल साकारणारा कॉमेडीयन खरोखर झाला अध्यक्ष ? कुठे घडलंय हे ?? – चित्र 3

Volodymyr यांचा हा विजय युक्रेनमध्ये अनागोंदी माजू पाहणाऱ्या रशियन कट्टरपंथीयांच्या विरोधातला विजय मानला जातोय. त्यांचे विरोधक Petro Poroshenko यांनी त्यांच्या विनोदी अभिनेता असल्याबद्दल खिल्ली उडवली होती आणि युक्रेनच्या नागरिकांना त्यांना मत दिल्यास देशाला भारी किंमत मोजावी लागेल असं सांगितलं होतं, पण जनतेने दिलेला कौल काहीतरी वेगळंच सांगतोय.

तर मंडळी, हा योगायोग म्हणायचा की चमत्कार ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख