कथा गुप्तहेरांच्या

आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना गुप्तहेरांबद्दल प्रचंड कुतूहल आणि आदर मिळतो. अर्थात ज्या प्रकारचं काम हे गुप्तहेर करतात, त्या कामामुळं हे कुतूहल आणि आदर दोन्ही गोष्टींना गुप्तहेर सार्थ ठरतात. गुप्तहेर देशासाठी फक्त जीवच धोक्यात घालत नाहीत, तर त्यासोबत असतं त्यांचं कमालीचं कर्तृत्व. कित्येकदा ते परक्या देशात ओळख लपवून राहतात, पकडले गेले तर देश आपला गुप्तहेर म्हणून ओळख नाकारेल हे ही त्यांना माहित असतं, पावलोपावली धोके तर असतातच. या सर्व गोष्टींमुळे त्यांचं काम कसं चालतं, हे कौशल्य ते कसं मिळवतात याबद्दल प्रचंड औत्सुक्य पाहायला मिळतं. म्हणूनच की काय, पण गुप्तहेरांवरचे सिनेमे केवळ भारतातच नाही, तर पूर्ण जगभरात तुफान चालतात.
आम्ही अशाच काही कर्तृत्ववान गुप्तहेरांची माहिती एका लेखमालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. हे परदेशात आपली ओळख बदलून राहिले आणि त्यांची देशाला प्रचंड मदत झाली आहे.