बाजीरावाचे बजेट
रणवीर सिंगचा पहिला गाजलेला यशस्वी सिनेमा म्हणजे ’बँड बाजा बारात’. दहा कोटीत बनलेला हा सिनेमा निर्मात्याला अठरा कोटी देऊन गेला. तर बाजीराव-मस्तानीचे बजेट होते १४० कोटीचे आणि निर्मात्याला १६५ कोटी मिळाले. अर्थातच रणवीरचे उत्पन्नही दिवसेंदिवस वाढत जाते आहे पण पैशांच्याबद्दल बोलताना रणवीर म्हणतो " पैसे कसे येतात ते मला कळले आहे आणि ते कसे गुंतवावे हे मी वडिलांकडून शिकलो आहे. माझी पहिली गरज मुंबईत माझे स्वतःचे घर घेण्याची आहे , ते आधी. नंतर गुंतवणूकीचा विचार करता येईलच."
बाजीराव रणवीर सिंगला पैशाची नवलाई नाही. सिनेजगतात येण्यापूर्वीच तो पुरेसा श्रीमंत होता. त्याचे वडील जगजितसिंग भवनानी यांचा ऑटोमोबाईलचा व्यापार आहे. बाकी इतर अनेक धंद्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. पैशाबद्द्ल बोलताना रणवीर म्हणतो " आजही माझ्या गरजा घरच्या पैशानीच भागतात. मी आदीदासचा ब्रँडचा अॅबेसेडर आहे त्यामुळे मी फक्त त्यांचेच कपडे वापरतो. डाएट करणे हा माझ्या कामाचा भाग आहे. त्यामुळे माझे पैसे फारसे खर्च होत नाहीत. म्हणून जे पैसे मी कमावतो त्यातला बराचसा हिस्सा हा गुंतवणूकीतच जातो. माझे वडील माझे आदर्श आहेत. पैशाची काळजी कशी घ्यायची हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. हे व्यवहार अर्थातच माझे वडील बघतत. माझा शेअरबाजारावर फारसा विश्वास नाही त्यामुळे बहुतेक गुंतवणूक ही रीअल इस्टेटमध्येच करतो. " (ही गुंतवणूक किती हे सांगण्याचे मात्र तो टाळतो.)
जाहिराती आणि एंडॉर्समेंट : " सिनेमावाल्यांसाठी गुड फ्रायडे म्हणजे सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याचा दिवस. या दिवशी गर्दी झाली तर जाहिराती आणि प्रॉडक्ट एंडॉर्समेंटसाठी लगबगीने फोन यायला सुरुवात होते. सुरुवातीला मी ही कामे नाकारली कारण लोकांना माझी किंमत पुरेशी कळत नव्हती. मी थांबलो. ज्या दिवशी माझी किंमत लोकांना कळली त्या दिवसापासून मी ही सर्व कामे घ्यायला सुरुवात केली."
आता तर तो ड्युरेक्स कंडोमची पण एंडॉर्समेंट करतो.
रणवीर पैसा जपूनच खरच करतो. त्याचे खर्च होम थिएटर आणि म्युजीक सिस्तीमवर जास्त होतात. दोन तीन वर्षानी तो नविन गाडी घेतो. सध्या तो दोन कोटीची जग्वार गाडी वापरतो. स्पोर्टस कार घेण्यात त्याला रस नाही. मागच्या सिटवर आरामात बसून त्याला काम करायला आवडते. मुंबईच्या ट्रॅफीकमध्ये स्पोर्ट्स कार घेणे -वापरणे त्याला पसंत नाही.
आता वाचा त्याचा दूरगामी विचार .तो म्हणतो "मला सिनेमा (मे) बनवायचे आहेत पण त्या आधी आशय समृध्द लिखाणाची आवश्यकता आहे.चांगल्या सिनेमासाठी चांगल्या कथेची आवश्यकता आहे. आमच्या इंडस्ट्रीत चांगल्या लिखाण्ला चांगले पैसे दिले जात नाहीत म्हणून येणार्या काळात मी माझी गुंतवणूक "कंटेंट डेव्हलपमेंट" मध्ये करणार आहे.
लेखकांनो सरसावून लेखण्या हातात घ्या कदाचीत यावर्षी दिवाळी अंकात लेख लिहीण्यासाठी वेळ मिळणार नाही.