computer

भाग ५ - २०२२ सालचे फोर्ब्स 30 under 30!! पाहा या युवापिढीची गरूडझेप!!

आजची तरुण पिढी म्हणजे  आळशी आणि फक्त   मोबाईलमध्ये घुसलेली असा सूर सगळीकडे ऐकायला मिळतो.  मोबाईलमध्ये घुसून गेम्स खेळणे आणि गप्पा मारणे. फोटो ,व्हिडीओ काढणे एवढ्याच गोष्टी मुलं  करतात का?  खरतर ही नाण्याची एकच  बाजु आहे.आज जग झपाट्याने बदलत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीचा आविष्कार होत आहे. आजची  हुशार तरुणाई हेच शिकून  मिळालेल्या संधीचे सोने देखील करत आहे. आपापले कौशल्य दाखवून यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहे. Quick and fast अशी ही पिढी आहे.आपल्या मेहनतीच्या, कल्पक्तेच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध करत आहे.  म्हणूनच  फोर्ब्स इंडिया ने  त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फोर्ब्स 30 under 30 २०२२ची यादी जाहीर झाली आहे. आणि त्यात आपली भारतीय युवकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे.

आपण आजच्या भागात त्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊयात.

 

शैली गर्ग, ग्लोबलफेअर टेक्नॉलॉजीज

 शैली मूळची  राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील नसीराबाद शहरातून आहे.शिक्षण पूर्ण केल्यानंतर शैलीने मुंबई, नंतर P&G आणि Stanza Living मध्ये नोकरी केली. मार्च 2020 मध्ये, तिचे  पॅकेज वार्षिक ४० लाख रुपये असताना  तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आणि स्वत:चा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्धार केला. छोट्या देशांतील उत्पादकांना निर्यातीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम तिने सुरू केले . त्यावेळी तिच्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला. पण अवघ्या दोन वर्षात तिच्या कंपनीची उलाढाल १०० ते ११० कोटींपर्यंत पोहोचली. ग्लोबलफेअर, गुरुग्राम-आधारित स्टार्टअप, ही एक सोर्सिंग कंपनी आहे जी जगभरातील व्यवसायांना हमीभावाच्या सर्वोत्तम दरात दर्जेदार वस्तू पुरवते ग्लोबलफेअरमध्ये, तिची टीम उच्च-गुणवत्तेचे ग्रॅनाइट,  दगड आणि टाइल्सची विस्तृत श्रेणी तयार करते.  नवीन तंत्रज्ञानाद्वारे त्यामध्ये विविधता देते. भारतीय बाजारपेठेतून आत शैलीची जागतिक बाजारपेठेत प्रवेश करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मेहनत ती घेत आहे.


 

ओशीन शिव, कलाकार

एखाद्या भारतीय  कलाकाराचे नाव forbes मध्ये असणे ही बाब खूप अभिमानाची गोष्ट आहे.ओशीन शिव एक  भारतीय चित्रकार आहे. ती गोव्याची आहे.  म्युरॅलिस्ट आणि व्हिज्युअल डिझायनींग वर तिचे विशेष प्र्भत्व आहे. तिने दोन वर्षे ग्राफिक डिझायनर आणि डिझाइन संशोधक म्हणून काम केले .दीड वर्षा पासून  ती फ्रीलांसर इलस्ट्रेटर म्हणुन काम करत आहे. अनेक कला महोत्सवा मध्ये त्यांची चित्र सादर झाली आहेत.  डिजिटल तसेच पारंपारिक पद्धतीने त्यांचे काम चालते. फक्त भारतात नाही तर परदेशातही तिच्या कामाची स्तुती झाली आहे. तिच्या  क्लायंटमध्ये  मोठमोठी  नावे आहेत जसे की,Absolut, Gucci, Vans, Converse, आणि  Levi's.

 

राशिद खान,- Yellow.AI

२०१५ साली खान यांनी  संभाषणासाठी  AI कंपनी Yellow.ai ची स्थापना केली. या  कंपनीचे स्वतःचे  भाषा प्रक्रिया इंजिन आहे. यामुळे  क्लायंटला १००  पेक्षा जास्त भाषांमध्ये चॅटबॉट्स आणि व्हॉइस बॉट्स तयार करण्यात मदत होते. या AI इंजिनचा  वापर ग्राहक सेवा किंवा कॉल सेंटर स्वयंचलित करण्यासाठी केला जातो. Yellow.AI चे अनेक मोठे  ग्राहक आहेत. Domino's, Sephora आणि Asian Paints ही त्यातली काही नावे आहेत. भारतात त्यांचे 1,000 पेक्षा जास्त ग्राहक आहेत. कंपनीचा १०.५० करोड इतका बिझनेस आहे.

 

सुजय सुरेश कुमार, लिलू

नवजात बाळासाठी आईचे दुध अत्यावश्यक असते.  बाळ जन्माला आल्यावर काही मातांना दूध  पाजणे अवघड होते म्हणून  सुरेश कुमार यांनी २०१६  मध्ये नवे तंत्रज्ञान वापरून नवीन मातांना हँड्स-फ्री सिस्टीमचा शोध लावला. यासाठी  कमी कष्टात आईचे दूध काढण्यास मदत करण्यासाठी मसाजिंग ब्रा आणि पंपचे पेटंट घेतले. त्यामुळे दुध काढणे सोपे झाले. यासाठी पैसे उभे करणे अवघड होते पण प्रयत्नांनी त्यांना लि Y-Combinator, Ad Astra Ventures, आणि WeWork Labs कडून मदत मिळाली. आणि आता अनेक हॉस्पिटलमध्ये त्याची चाचणी होते आणि अनेक जणींना याचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत .

 

पुबारुन बसू, छायाचित्रकार

पुबारुन बासू हे नाव आता अनेकजणांना माहित झाले आहे. एक फोटोग्राफर म्हणून त्यांचे अनेक फोटो मोठ्या स्तरावर गाजले आहेत. बसू यांना  चार वर्षांचा असल्यापासून फोटो काढण्याची आवड  आहे. म्हणून फोटोग्राफीत व्यवसाय करायचा असे त्यांनी ठरवले. त्यांची नजर आणि फोटो टिपायचे कौशल्य पाहून अनेक जण प्रभावित झाले. नॅशनल जिओग्राफिक, द गार्डियन, बीबीसी आणि सीएनएन यांसारख्या मोठ्या स्तरावर त्यांचे फोटो प्रकाशित झाले. त्यांना सोनी वर्ल्ड फोटोग्राफीचा युवा छायाचित्रकार पुरस्कारही मिळाला आहे. भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेले फोटो ही त्यांची खासियत आहे.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required