जय आणि अदितीचा नव्या नाटकात मिटला दुरावा!

जय (सुयश टिळक) आणि अदिती (सुरुची आडारकर) ( का रे दुरावा?ची जोडी ) यांचे एक नविन नाटक  येतं आहे स्ट्रॉबेरी! काही मोजक्या निमंत्रितांसाठी या नाट्काचा प्रयोग नुकताच सादर करण्यात आला. इतरेजनांसाठी हा प्रयोग कधी होणार आहे याच्या तारखा अजून लागायच्या आहेत पण या नाटकाचे पोस्टर मात्र सध्या चर्चेत आहे. पोस्टर बघितल्यावर ही खळबळ का हे  कळेल. एक गोष्ट नक्की की या पोस्टरची संकल्पना ज्या कलाकाराची आहे त्यानी भरपूर गृहपाठ केलेला दिसतो आहे. अर्थात स्ट्रॉबेरी या फळाची ख्यातीच तशी आहे. लालबुंद, रसाळ, आंबटगोड आणि हृदयाच्या आकाराचे फळ हे पुरातन काळापासून प्रेमाचे प्रतिक मानले जाते. प्रेमाची देवता व्हीनसच्या अधिपत्याखाली येणारे हे फळ दोन व्यक्तिंनी ओठांनी अर्धे-अर्धे तोडून खाल्ले तर ते प्रेमात पडतात. मराठी नाट्यसृष्टीला असे चुंबनदृष्य धक्कादायक वाटते आहे यात काही नवल नाही. नव्या पिढीला अर्थातच या दृष्यात काही वावगे वाटणार नाही पण नवी पिढी मराठी नाटक बघते का ? हाच मोठा सवाल आहे. त्यामुळे मध्यमवयीन प्रेक्षकांना हे दृश्य जरा वाह्यातच वाटते आहे. याला साक्ष आहे रविवारच्या लोकसत्तात आलेल्या लेखाचा काही भाग. "नाटकांचे विषय वेगळे असल्याने त्याची जाहिरात वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी असा ‘बोल्ड’पणा दाखविण्यात येतो. मराठी प्रेक्षकांसाठी हा ‘धक्का’ असला तरी बदलत्या काळानुसार प्रेक्षकांना नाटकाकडे आकृष्ट करून घेण्यासाठी अशा काही क्लृप्त्या लढविणे आवश्यक असल्याने अशा प्रकारे जाहिरात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र मराठी नाटकाची जाहिरात ‘बोल्ड’झाली तरी तिने आपली ‘पातळी’ ओलांडून आणखी ‘खाली’ येऊ नये, अशी अपेक्षा सुजाण व सुसंस्कृत प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे."  

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required