computer

मोबाईल जास्त वापरला म्हणून लोकांना शिंग फुटत आहे ?? काय आहे हे प्रकरण ??

सध्या मोबाईल म्हणजे एक व्यसन झाले आहे. मोबाईलचे व्यसनमुक्ती केंद्र उघडल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. कारण मोबाईलचा वापर कितीही योग्य कारणासाठी केला तरी त्याचे नुकसान पण तितकेच आहेत!! अनेकांना डोळ्याचे, मणक्याचे रोग होतात. माणूस आळशी बनत जातो. हे इथवर ठीक होतं राव, पण आता मोबाईलचा जास्त वापर करणाऱ्या लोकांनी सावध व्हायची गरज आहे !! कारण मोबाईल जास्त वापरल्यामुळे तुम्हाला शिंगे येण्याचा धोका आहे. तुम्ही म्हणाल काही पण काय फेकता राव!! पण हे खरे आहे मंडळी!! हा दावा केला आहे ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध युनिव्हर्सिटी ‘सनशाईन कोस्ट’ने.  

या युनिव्हर्सिटीने एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे त्यात असा दावा करण्यात आला आहे, की जे मोबाईलवर तासनतास पडीक असतात. त्यातल्या त्यात ज्यांचे वय 18 ते 30 च्या दरम्यान आहे ते लोक या नविन प्रॉब्लम मध्ये अडकू शकतात. सनशाईन कोस्टच्या रिसर्सनुसार मोबाईलवर जास्त वेळ काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याच्या मागच्या भागात एक अणकुचीदार हाड वाढत असते. या अणकुचीदार हाडाला 'टेक्स्ट नेक' असे नाव देण्यात आले आहे. या हाडाचा आकार 2.6 सेमी पर्यंत असु शकतो. आणि हा फक्त दावा नाही मंडळी असे हजारो केसेस पुढे आलेल्या आहेत ज्यात स्पष्ट समजते की जे मोबाईलचा अतिवापर करतात त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागात हाड वाढलेले आहे.

याचे कारण त्या रिसर्सने असे सांगितले की मोबाईलचा वापर करणारा व्यक्ती सहसा त्यात मान खुपसुन बसलेला असतो. त्यामुळे त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागात हाड वाढते आणि शिंगाप्रमाणे दिसू लागते. याच्यावर एकंच उपाय आहे - मोबाईलचा वापर कमी करणे.

मंडळी, आई म्हणते तसं मोबाईलला आग लावणे आपल्याल सहज सोप्पे नाही. निदान आपण मोबाईलचा कमी वापर नक्कीच करू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required