computer

या १० मानवी चुकांनी जगाचा आधुनिक इतिहास पारच बदलून टाकला..

“चुकणं हा मनुष्यधर्म आहे” असं म्हटलं जातं. पण त्या चुकीची परिणीती इतिहास बदलण्यात झाली तर हो? असं झालंय तर खरं.  उत्सुकता आहे ना या चुका काय असतील जाणून घेण्याची? वाचा तर मग...

१. रशियाने अलास्का अमेरिकेला विकला

१८६७मध्ये रशियाने त्याच्याकडची निरुपयोगी जमीन म्हणजेच, अलास्का अमेरिकेला केवळ ७२ लाख डॉलर्सना विकली. पुढे याच अलास्कात करोडो डॉलर्सची नैसर्गिक साधनसंपत्ती सापडली. रशियाला याबद्दल नक्कीच पश्चात्ताप झाला असेल.

२. चुकीच्या भाषांतरामुळे मंगळावर जीवसृष्टी आहे असा लोकांचा समज झाला

१८७७मध्ये एका इटालियन अंतराळवीराने मंगळावर  हवामानामुळे तयार झालेल्या चर किंवा खंदकांचं वर्णन करताना ’कनाली’ म्हणजेच ’वाहिन्या’ असं म्हटलं होतं. अमेरिकन अंतराळवीरानं याचा अनुवाद करताना त्यानं ते मानवनिर्मित खंदक असल्याचं म्हटलं.  त्यामुळं  तिथं लोक वा एलियन राहतात असा त्याचा आणि पर्यायाने आपला सार्‍यांचा समज झाला.

३. एका किल्ली हरवली नसती तर कदाचित टायटॅनिक बुडालं नसतं.

ज्या हिमनगाला धडकून टायटॅनिक फुटलं आणि नंतर बुडलं, तो हिमनग जहाजावरच्या लोकांना कदाचित दिसला असता. पण झालं काय, ज्या दुर्बिणींतून हा हिमनग दिसला असता, त्या दुर्बिणी एका कपाटात होत्या.  आणि नेमकी या कपाटाची किल्ली हरवली होती. मग काय, अगदी जवळ येईपर्यंत तो हिमनग कुणाला दिसलाच नाही. 

४. पहिलं महायुद्ध एका चुकीच्या यू टर्नमुळं घडलं.

आपण सगळेजण शाळेत शिकलोच आहोत, पहिल्या महायुद्धाचं तत्कालिक कारण काय घडलं ते. ऑस्ट्रियाच्या आर्चड्यूकचा खून झाला आणि महायुध्दाला तोंड फुटलं. हा खून व्हायचा टळला असता. पण झालं काय, त्या आर्चड्यूकच्या ड्रायव्हरनं चुकीचा यूटर्न घेतला आणि घेतली की हो गाडी थेट खुन्याच्या समोर. मग काय, त्याला आयतंच सावज सापडलं आणि त्यानं फ़्रान्झ फर्डिनांडला गोळ्या घातल्या. 

५. एका राजकीय पुढार्‍याचं भाषण चुकीचं समजून घेतल्यामुळं बर्लिनची भिंत पडली

पूर्व आणि पश्चिम जर्मनीमध्ये एक भिंत बांधण्यात आली होती. एका बाजूहून दुसरीकडे जाणं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी लग्न, मर्तिक असं काही कारण दाखवून व्हिसा घ्यावा लागे. १९८९मध्ये एकदा या प्रवासाबद्दलच्या काही लहानसहान सुधारणांबद्दल बोलताना एका  राजकीय पुढार्‍यानं प्रश्नाला उत्तर देताना “ताबडतोब, आत्ता लगेच” असं म्हटलं. त्याला म्हणायचं होतं की नवे नियम लगेच लागू होतील. लोकांना वाटलं की लोक आत्ता लगेच ताबडतोब बॉर्डर पार करुन येऊ शकतील. त्यामुळं लोकांनी खूष होऊन थेट भिंतच पाडून टाकली. 

६. नॉर्मंडीचं युद्ध जर्मन फौज त्यांचा सेनापती बायकोच्या वाढदिवसासाठी गेल्यामुळं हरली.

हे सेनापतीराव त्यांच्या युद्धाच्या ठिकाणी नसताना दोस्त राष्ट्रांनी त्या फ्रेंच किनार्‍यावर ताबा मिळवला आणि फौज हे युद्ध हरली.

७. एका जपानी शब्दाचा चुकीचा अर्थ घेतल्यानं हिरोशिमावर बॉंब टाकण्यात आला.

होमनॉमी म्हणजे एकाच उच्चाराचा, पण भिन्न अर्थाचा शब्द!! तर झालं काय, जेव्हा दोस्त राष्ट्रांनी जपानला शरण यायला सांगितले, तेव्हा त्यांचे पंतप्रधान म्हणाले, “मोकुसात्सुम”( Mokusatsum)- म्हणजे हे विचाराधीन आहे. पण याच “मोकुसात्सुम” चा दुसरा अर्थ आहे – धुडकावून लावणे. नेमका हाच अर्थ अमेरिकन फौजांनी घेतला आणि त्यांनी हिरोशिमावर बॉंब टाकला.

८. रशियाचा जोसेफ स्टॅलिन त्याने स्वत:च त्याच्या रक्षकांना दिलेल्या आदेशामुळे मेला

त्यानं त्याच्या रक्षकांना त्याला ’डिस्टर्ब’ करु नये म्हणून सूचना दिल्या होत्या. त्यामुळं त्याला ब्रेन हॅमरेज झालं तरी रक्षक त्याच्या खोलीत जायला घाबरत होते.

९. अमेरिकेचं क्युबावरचं आक्रमण त्यांनी वेगवेगळे टाईमझोन विचारात न घेतल्यानं अयशस्वी झालं

१९६१मध्ये अमेरिकेनं क्युबावर आक्रमण केलं. पण तेव्हा पेंटागॉनने दोन देशांतले वेगवेगळे टाईमझोन विचारात घेतलेच नाहीत. त्यामुळं अमेरिकन फायटर जेट्स तब्बल एक तास उशीरा पोचले आणि तिथल्या क्रांतीकारकांना वेळेत कुमक उपलब्ध होऊ शकली नाही. नाहीतर क्यूबन क्रांती तेव्हाच यशस्वी झाली असती.

१०. १९९९ मध्ये नासाचं अवकाशयान एका प्रोग्रॅमिंग एररमुळे कोसळलं

या अवकाशयानाचं प्रोग्रॅमिंग करताना अमेरिकन प्रोग्रामर्स एककं मेट्रिक सिस्टिममध्ये बदलून घेण्यास विसरले. परिणामी सगळी गणितं चुकली आणि बराच खर्च करुन आकाशात सोडलेलं अवकाशयान कोसळलं.

सबस्क्राईब करा

* indicates required