तुमच्या आवडत्या ब्रँडचे जुने लोगो नक्की कसे होते माहित आहे? नव्यापेक्षा जुनाच लोगो चांगला होता असं कोणत्या ब्रँडच्या बाबतीत वाटतंय का?

माणसांसारखीच ब्रॅंडला पण 'मेकओव्हर' ची गरज असते. बदलत्या जमान्यात आपला लोगो म्हणजेच आपली जनमानसातली प्रतिमा फारच मागासलेली दिसू नये म्हणून कंपन्या ब्रँड लोगो बदलत असतात. केवळ लोगोच नव्हे तर सोबत प्रॉडक्ट पॅकिंग पण बदलत असते. तोच तो लोगो आणि पॅकिंग बघून ग्राहक आपली पसंती बदलण्याची शक्यता फार मोठी असते. पसंत बदलली की विक्रीचे आकडे पण खाली येतात. रिटेलर्स पण शोकेसमध्ये तीच वस्तू ठेवतात जी नजरेस पडताच ग्राहकाला घ्यावीशी वाटते. बदललेल्या तंत्रज्ञानाची जोड देऊन जुन्याला नवे स्वरूप देणे आता सहज शक्य होते आहे.त्यामुळे ब्रँड लोगो बदलणे अपरिहार्य असते

बऱ्याच कंपन्यांनी अनेक वेळा लोगो बदलले आहेत. मर्जर आणि टेकओव्हरच्या जमान्यात तर असे बदल अनिवार्य असतात. आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या ब्रॅंड्सचे नवे आणि जुने लोगो आणले आहेत. खाली दिलेल्या नवीन लोगोवर क्लिक करून जुने लोगो पाहा.

वाचकांनो असे लोगो मेक ओव्हर का करावे लागतात हे समजून घ्यायचे असेल तर शर्मिला टागोर आणि संजीवकुमारचा गृहप्रवेश नक्की बघा इतके जाताजाता नक्की सांगू !

सबस्क्राईब करा

* indicates required