तुमच्या सुंदर साड्यांना पुन्हा उपयोगात आणायच्या २५ सॉलीड आयडियाज..
साडी हा अगदी सगळ्या स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा. हातमागावर विणलेल्या, सिल्क, कशिदाकारी केलेल्या, तर कधी प्लेन, काठपदराच्या, डिझाईनच्या, प्रिंटेड.. कितीतरी प्रकारच्या साड्या आणि व्हरायटी असते. पण मग रोज काही या साड्या वापरल्या जात नाहीत, त्यांच्यासोबत इतक्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात, की त्या टाकवत किंवा कुणाला देऊन टाकाव्याशा वाटत नाहीत.. आणि नुसती कपाटातली जागा अडवली जाते.
यावर एक मस्त उपाय आहे.. एक चांगला शिंपी शोधायचा आणि त्या साड्यांचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस शिवून घ्यायचे. आजकाल इंडोवेस्टर्न, फ्युजन या नावाखाली अशा कपड्यांच्या फॅशनची चलती आहेच.. हे ड्रेसेस शिवताना तुम्ही तुमची कल्पकता दाखवून "रंग माझा वेगळा" हे सिद्ध करू शकताच.. तुम्हांला याकामी मदत म्हणून बोभाटाची टीमही अशा काही कल्पना घेऊन आलीय.
या आधी आम्ही अशा आठ आयडियाज तुमच्यासोबत शेअर केल्या होत्याच, त्यात ही आणखी २५ प्रकारांची भर. काय म्हणता?
चला तर मग, शिंपी शोधण्याआधी कोणत्या साडीचं नक्की काय करायचं हे ठरवूयात..
१. बनारसी साडी फ्लोर लेन्ग्थ अनारकली
प्रत्येक घरी किमान एक तरी बनारसी शालू असतोच असतो. इतर रेशमी साड्यांत काहींच्या बॉर्डर अत्यंत मोठ्या असतात, जुन्या सिनेमांतल्या रेखा-जयाप्रदाच्या साड्यांसारख्या. या साड्यांपासून छानसा पायघोळ ड्रेस बनवता येईल. एखाद्या समारंभात हा ड्रेस छानच उठून दिसेल.फक्त जवळच्या लग्नात बनारसी शालू घातलेला शोभेल, पण हा ड्रेस कोणत्याही समारंभात घातलेला चालू शकेल..
कधीकधी साडी छान राहाते, पण काठ खराब होतात. अशा वेळेस साडीचा ड्रेस आणि नवीन बॉर्डर, बनारसी ब्रोकेड किंवा प्लेन योक, असंही काँबीनेशन तुम्हांला करता येईल.
२.
प्रत्येक साडी सिल्कचीच असावी असा काही नियम नाही. उलट कॉटनचे ड्रेसेस वापरायला एकदम सुटसुटीत आणि कधी घालावे, कधी नको.. हा प्रश्नही नाही. या प्रकारासाठी माहेश्वरी, इंडिगो किंवा अजरख प्रिंट, ब्लॉक प्रिंट, मंगलगिरी.. अशा कोणत्याही साड्या वापरता येतील. पाठीच्या गळ्यासाठी थोडी कल्पकता दाखवलीत, तर एक हॉट ड्रेस बनेल बरं..
शिवाय नवरात्रीत, मैत्रिणीच्या मेहंदी-हळदी समारंभात वापरायला एक हटके प्रकारही तुमच्याकडे असेल. बेल्ट, लटकन किंवा पुढच्या बाजूला ऑक्साईडचे झुमके लावलेत तर मग काय विचारायलाच नको..
३.
बनारसी साडीइतका भारी नसला तरी, हा प्रकार भन्नाट आहे बरं. करायचं इतकंच आहे, की प्रकार तुम्ही वरपासून खालीपर्यंत ओपन जॅकेटसारखा शिवायचाय. सगळी बट्णं लावलीत तर हा तुम्ही ड्रेस म्हणून वापरू शकता, साडीवर ब्लाऊज कम जॅकेट म्हणून वापरू शकता, एखाद्या काँट्रास्ट गाऊनवर ओपन जॅकेट म्हणून वापरू शकता, किंवा लेगिंग्जवर फ्रंट स्लिट ओपन ड्रेस म्हणूनही वापरू शकता.
या व्हिडिओवरून तुम्हांला थोडी आयडिया येईल पाहा..
४.
पैठणीसोबत जितके प्रयोग करावे तितके कमी आहेत. तिचा भरजरी राजस पदर, सुंदर बॉर्डर्स.. अहाहा..
५.
हा सगळ्यात भन्नाट प्रकार आहे. अगदी काँट्रास्ट नाही, पण थोड्या पूरक रंगांच्या दोन साड्या, बॉर्डर आणि मॅट गोल्डन फिनिशची चुडीदार..
दोन साड्या खर्ची घालायच्या नसतील तर यासाठी छानसे सिल्कचे दुपट्टेही वापरता येतील. साडी पन्ना असलेले आणि पूर्ण अडीच मीटर लांबीचे दुपट्टे यासाठी खास कामी येतील.
६.
७.
बनारसीइतका भारी नाही पण कॉटन इतका कॅज्युअलही नाही असे हे ग्रेसफुल फ्लोर लेन्ग्थ ड्रेस!! साडीचा प्रकार बदलला की ड्रेसचा पूर्ण लूकच बदलून जातो.
८.
सगळे ड्रेसेस पायघोळ असण्याची गरज नाही. इकत, कलमकारी, कर्नाटकी कॉटन अशा विविध प्रिंट्समध्ये तुम्ही शॉर्ट, नी लेन्ग्थ किंवा अँकल लेन्ग्थ असे वेगवेगळे प्रकार ट्राय करु शकता.
९.
१०.
११.
बॉर्डरचा कलात्मक उपयोग, थोडी एम्ब्रॉयडरीच्या वापराने तुम्ही काहीही करु शकाल, नाही का?
१२.
१३.
अनारकली किंवा पायघोळ ड्रेसेस दोन प्रकारे वापरता येतात.. हौस असेपर्यंत अनारकली म्हणून वापरायचा.. ती फिटली, की घेरदार ड्रेसचा मस्त लेहंगा आणि वरच्या भागाचं क्रॉप टॉप!! कशी वाटली आयडिया? यात मग पोचमपल्ली, जमदानी, संबलपुरी, कोणत्याही साड्यांचे ड्रेसेस छान दिसतात.
योकसाठी खास दुसरं सिल्कचं कापड वापरलंत, तर हा साडीचा ड्रेस आहे हे कुणाला सांगून पटायचं नाही!!
१५.
आई आणि मुलीकडे किमान एकतरी असा मॅचिंग किंवा काँट्रास्ट मॅचिंग ड्रेस असायलाच हवा!! "मी आणि आई, सॉलीड टीम", हो की नाही?
१६.
चंदेरी किंवा प्लेन टसरचे ड्रेस अगदी राजस दिसतात. यातही लेहेंगा, वनपीस, असे प्रकार ट्राय करायला हरकत नाही.
१८.
दोन विविध रंगांचं कॉम्बीनेशन असलेला हा ड्रेस या निळ्या रंगाला किती न्याय देतोय, नाही?
२०.
२२.
सध्या कुर्त्यासोबत स्कर्ट ही फॅशनच आहे. हा स्कर्ट मिक्स अँड मॅचमध्ये तुम्ही नंतर क्रॉप टॉप, ब्लाऊज, असं कशावरही घालू शकता..
२४.
जंपसूट शिवणं हेदेखील काही वाईट आयडिया नाही. पण हो, जरा चांगल्या क्वालिटीचं अस्तर लावा आतून..
सिल्क आणि कॉटनचा मिलाफ केलेला हा इंडोवेस्टर्न गाऊन सुंदरच दिसतोय नाही?
हे ही पाहा.. तुमचा वॉर्डरोब सजवा जॅकेट ब्लाऊजसोबत.. पाहा जॅकेट ब्लाऊजचे एक से बढकर एक १३ प्रकार..
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा